मुंबई : भारत हा जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे सोन्याचा वापर खूप जास्त आहे. परंपरेनुसार सोन्याचे दागिने भारतीयांची पसंती आहेत. अलीकडच्या काळात ते गुंतवणुकीचे माध्यम म्हणूनही उदयास आले आहे. गेल्या वर्षी करोनाच्या प्रभावानंतरही भारतीयांनी सोन्याची विक्रमी खरेदी केली आणि सोन्याची आयात १० वर्षांहून अधिक काळातील उच्चांक ठरली.

लग्न आणि वाढदिवसासारख्या प्रसंगी जवळच्या लोकांना भेटवस्तू देण्यासाठी अनेक लोकं सोन्याच्या दागिन्यांना सर्वाधिक प्राधान्य देतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गिफ्टमध्ये दिलेले असे दागिने करमुक्त नाहीत. एका मर्यादेनंतर त्यांच्यावर कराची जबाबदारीही टाकली जाते आणि ती न भरल्यास करचुकवेगिरीचे आरोपांना सामोरे जावे लागते.

सोन्यात गुंतवणुकीचा विचार करताय! आता आहे सुवर्ण संधी, ‘या’ योजना ठरतील फायदेशीर
कोणत्या प्रकरणांमध्ये कर लागू नाही
काही प्रकरणांमध्ये भेटवस्तू म्हणून मिळालेले सोने करमुक्त असते. लग्न, किंवा वाढदिवस यांसारख्या प्रसंगी कुटुंबातील सदस्यांकडून भेटवस्तू म्हणून मिळणारे सोन्याचे दागिने करमुक्त आहेत. याशिवाय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारशाने मिळालेल्या सोन्याच्या दागिन्यांवर कोणतेही कर लागू पडत नाही. या प्रकरणांमध्ये दागिन्यांची किंमत किंवा प्रमाण यावर मर्यादा नाही. मात्र नंतर जर तुम्ही हे दागिने विकले तर तुम्ही कर देण्यास जबाबदार आहेत.

भाडे करार ११ महिन्यांसाठीच का असतो, रेंटवर राहायला जाणार असाल तर जाणून घ्या
कर कसा निश्चित होतो
अशा प्रकरणांमध्ये दीर्घकालीन भांडवली लाभ कराची जबाबदारी निर्माण होते. भांडवली नफा कराची गणना करण्यासाठी होल्डिंग कालावधी आधार म्हणून वापरला जातो. तुम्हाला भेटवस्तू मिळाल्याच्या दिवसापासून होल्डिंग कालावधी मोजला जात नाही. तर ज्या दिवसापासून कुटुंबाने तुम्हाला भेट दिलेले सोने खरेदी केले त्या दिवसापासून ते मोजले जाते. उदाहरणार्थ, तुमच्या लग्नात तुमच्या आईने तुम्हाला सोन्याचे दागिने भेट दिले. हे दागिने त्यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजे तुमच्या आजोबांकडून लग्नात मिळाले होते. जर तुमच्या आजोबांनी हे दागिने त्यांच्या काळात १ लाख रुपयांत विकत घेतले असतील, तर भांडवली नफा ठरवण्यासाठी या दागिन्यांची प्रारंभिक किंमत एक लाख रुपये घेतली जाईल. यानंतर, दागिन्यांच्या सध्याच्या किमतीतून भांडवली नफा एक लाख रुपयांनी वजा केला जाईल, ज्यावर कर दायित्व आकारले जाईल.

सोन्याची मागणी वाढली; भारताने पुन्हा केली विक्रमी आयात
मूल्याच्या आधारावर कर निश्चित केला जातो
लग्नात मिळालेल्या सर्व भेटवस्तू देखील करमुक्त नसतात. कुटुंबाबाहेरून मिळालेल्या भेटवस्तूंना एका मर्यादेपर्यंत करमुक्त केले जाते. कोणत्याही एका मूल्यांकन वर्षात केवळ ५०,००० रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू करमुक्त आहेत. तुम्हाला कोणत्याही एका वर्षात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू मिळाल्या असतील तर त्यांच्यावर कर भरावे लागेल. सर्व भेटवस्तूंचे एकत्रित मूल्य ५०,०० रुपयांपेक्षा जास्त असल्यास संपूर्ण मूल्यावर कर दायित्व निश्चित केले जाते.

होल्डिंग कालावधीचा मोठा खेळ

भांडवली नफा कराचा दर होल्डिंग कालावधीवर अवलंबून असतो. जर होल्डिंग कालावधी ३६ महिन्यांपेक्षा जास्त असेल, तर दीर्घकालीन भांडवली नफा कर आकारला जाईल, जो २० टक्के आहे. होल्डिंग कालावधी ३६ महिन्यांपेक्षा कमी असल्यास शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल. दागिने विकून कमावलेली रक्कम दर निश्चित करण्यासाठी तुमच्या एकूण उत्पन्नात जोडली जाईल. यानंतर, तुमचे उत्पन्न ज्या कर कक्षेत येते त्यानुसार टॅक्सचा दर निश्चित केला जाईल.

पैसे वाचवण्याच्या टिप्स
दीर्घकालीन भांडवली नफा कर टाळण्यासाठी कर नियमांमध्ये काही तरतुदीही करण्यात आल्या आहेत. आयकर कायद्याच्या कलम ५४F अंतर्गत या तरतुदी करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही दागिन्यांच्या विक्रीतून मिळालेले पैसे घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी वापरत असाल तर तुम्हाला दीर्घकालीन भांडवली नफा करातून सूट मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here