मुंबई: लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र भाजपनं सत्ता कायम राखण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं ३०३ जागा जिंकल्या होत्या. या सगळ्याच जागा आगामी निवडणुकीत जिंकता येतीलच याची खात्री नाही. काही जागांवर फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपनं मिशन ७२ ला सुरुवात केली आहे.

गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रातील राजकारणात नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ५० आमदारांनी बंड केलं. ठाकरे सरकारचं समर्थन काढलं. त्यामुळे सरकार कोसळलं. शिंदेंना शिवसेनेच्या ४० आणि १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय १२ खासदारही शिंदे गटात आहेत. मात्र तरीही भाजपला महाराष्ट्रात २०१९ सारखं यश मिळेल याची खात्री वाटत नाही.
Sharad Pawar : शरद पवार नितीशकुमार यांची भेट, देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळणार?
महाराष्ट्रासह पंजाब आणि बिहारमध्ये फटका बसेल असं भाजप नेतृत्त्वाला वाटतं. त्यामुळे भाजपनं मिशन ७२ ला प्रारंभ केला आहे. गेल्या निवडणुकीत भाजप ७२ मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होता. याच ७२ जागांवर आता भाजपनं जोर लावला आहे. यातील बहुतांश जागा भाजपनं थोड्या फरकानं गमावल्या होत्या.

मिशन ७२ संदर्भात भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतली. या मिशनवर २५ केंद्रीय मंत्री काम करणार आहेत. एकेका मंत्र्याला त्यांच्या राज्यातील २ ते ५ जागांची जबाबदारी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये भाजप एकूण १४४ मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी होता. पहिल्या टप्प्यात भाजपनं ७२ जागांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. केंद्रीय मंत्री या लोकसभा मतदारसंघांमध्ये जाऊन १ ते २ दिवस आढावा घेतील. स्थानिक नेत्यांशी बोलून रणनीती ठरवतील.
चार मुख्यमंत्र्यांच्या कारमध्ये सीटबेल्टचा तो जुगाड; गडकरींनी सांगितला धक्कादायक प्रकार
महाराष्ट्र, बिहार आणि पंजाबमध्ये नुकसान होऊ शकतं असा भाजप नेत्यांचा अंदाज आहे. त्याची भरपाई मिशन ७२ मधून केली जाईल. या ७२ जागा विविध राज्यांमध्ये आहेत. मोदी सरकार २०१४ पासून सत्तेत आहे. सत्ताविरोधी वातावरणाचा परिणाम भाजपचे खासदार असलेल्या मतदारसंघात पाहायला मिळू शकतो. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here