मुंबई: अभिनेते नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल म्हणजेच बुधवारी भेट देऊन गणपतीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एक ते दीड तास नानांच्या घरी होते, पण या भेटीतही त्यांच्या गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं. गेल्या आठवड्यात नाना पाटेकरांनी फोन करून घरच्या गणपतीच्या दर्शनाला या, असं आमंत्रण दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नाना आणि मी अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी या भेटीदरम्यान सांगितलं. तसंच मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर आणि त्यांच्या अभिनयाचंही कौतुक केलं. मला करोना झाला होता तेव्हा, मी नानांचे बरेच चित्रपट पाहिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
रजनीकांत समोर दिसताच त्यांच्या पाया पडली ऐश्वर्या राय, PS-1 ट्रेलर लॉन्चचा Video Viral
नानांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला, घरच्या आमराईत फेरफटका मारत बागेत वृक्षारोपणंही केलं. यादरम्यान नानांशी त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे सहकारी मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे अन् नानांच्या परिवारातील सदस्य देखील उपस्थित होते.

निर्सगाच्या सानिध्यात
नानांच्या घरी पोहोचताच मुख्यनंत्र्यांनी त्यांचं निसर्गाच्या सानिध्यात असेलल्या घराचं कौतुक केलं. नानांची अगदी छान जागेत हे घर बांधलय. त्यांची जागेची निवड एकदम उत्तम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीत नानांनी घर बांधलय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नानांच्या घराबद्दल अनेक गोष्टी जाणून घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here