जम्मू: पार्वतीच्या वेशभूषेत नाचणाऱ्या तरुणाचा रंगमंचावर मृत्यू झाला आहे. जम्मूच्या बिश्नेहमध्ये ही घटना घडली. पार्वतीच्या वेशभूषेत नाचत असलेला तरुण अचानक व्यासपीठावर कोसळला आणि उठलाच नाही. तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांपैकी काहींनी त्याला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

मंगळवारी जम्मूच्या बिश्नेहमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी योगेश गुप्ता नावाचा तरुण पार्वतीच्या पेहरावात नाचत होता. बराच वेळ नाचल्यानंतर तो अचानक व्यासपीठावर कोसळला. तो उठलाच नाही. हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाला.

जम्मूच्या बिश्नेह तहसीलमधील कोठे सैनियामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कलाकार देवी, देवतांच्या वेशभूषेत नृत्य करत होते. सतवारीमध्ये वास्तव्यास असलेला २० वर्षांचा योगेश पार्वतीच्या वेशभूषेत नृत्य कौशल्य सादर करत होता.

नाचता नाचता योगेश अचानक कोसळला. नेमकं काय झालंय हे थोडा वेळ कोणालाच समजलं नाही. त्यानंतर शंकराच्या वेशभूषेतला कलाकार त्याच्या जवळ गेला. त्यानं योगेशला उठवण्याचा प्रयत्न केला. पण योगेश निपचित पडला होता. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
कार मागे घेताना थेट तलावात; बाहेर पडण्यासाठी तरुणाचा प्रयत्न, पोहता येत नसल्यानं करुण अंत
मैनपुरीत हनुमान साकारणाऱ्या तरुणाचा मृत्यू
गणेशोत्सव मंडळातील कार्यक्रमात कला सादर करताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मैनपुरीत घडली. यावेळी तिथे शेकडो लोक उपस्थित होते. हनुमानाची भूमिका साकारणारा कलाकार अचानक मंचावर कोसळला. तो अभिनय करत असल्याचं उपस्थित प्रेक्षकांना वाटलं. मात्र थोड्याच वेळात त्याच्या शरीराची हालचाल थांबली. तेव्हा प्रेक्षक त्याच्या जवळ गेले. त्या कलाकाराला घेऊन त्यांनी रुग्णालय गाठलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
कीटकनाशक प्यायले अन् मंदिरात जाऊन बसले; मेडिकल व्यावसायिकाच्या आत्महत्येनं खळबळ
मैनपुरीतील बंशीगौरामधील शिव मंदिरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दररोज गणेशाची पूजा अर्चना सुरू आहे. भजन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळी या ठिकाणी भजनी मंडळाला बोलावण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत रवी शर्मा नावाचा कलाकारदेखील होता. हनुमानाच्या वेशभूषेत आलेला रवी भजनावर नाचत होता. नाचना नाचता रवी अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here