बारामती : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपच्या मिशन बारामतीवर जोरदार टीका केलीये. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून बारामतीला काय येता? बारामतीला धडका मारुन काय होणार? तिथे उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होतंय, तिथे काही होणार नाही, अशा शब्दात भाजपच्या मिशन बारामतीची अजित पवार यांनी खिल्ली उडवली. तसेच ज्याला स्वत:ला तिकीट नाही दिलं, तो काय माझ्या बारामतीत येऊन गप्पा मारतोय, अशा शब्दात अजितदादांनी बावनकुळेंचा समाचार घेतला. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा केला. खुद्द पवारांच्या काटेवाडी गावात जाऊन त्यांनी भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बावनकुळेंच्या बारामती दौऱ्याची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली. याचविषयी अजित पवार यांना विचारलं असता, त्यांनी भाजपच्या मिशन बारामतीचा पाणउतारा केला.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बावनकुळेंनी पुणे जिल्ह्यात पहिलाच दौरा केला, तो ही थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कर्मभूमी बारामतीत. भाजपने लोकसभा निवडणूक २०२४ साठी ‘मिशन ४५’ आखलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यातील जागा हिसकावून घेण्यासंबंधीचं प्लॅनिंग भाजपने केलं आहे. त्यानुसार आतापासूनच भाजपने तयारी सुरु केली आहे. येत्या २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील बारामती दौऱ्यावर येत आहे. त्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी बावनकुळेंनी विशेष घेतली. त्यांच्या याच दौऱ्याची संपूर्ण राज्यभर मोठी चर्चा पाहायला मिळाली.

बारामतीला काय धडका मारताय, तिथे काही होणार नाही!

अजित पवार म्हणाले, “शेतकऱ्याला शून्य टक्के व्याजाने पैसे मिळत होते, केंद्र सरकारने ते बंद केले. याचं उत्तर केंद्र सरकारमधले नेतेमंडळी कुणी देत नाही. असे महत्त्वाचे प्रश्न सोडलेत अन् बारामतीला गेलेत… तिथे जाऊन काय करणार आहेत, उगीच धडका घेतायेत.. तिथे उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होतंय, तिथे काही होणार नाही”

“मला कुणीतरी विचारलं भाजप प्रदेशाध्यक्ष बारामतीला आले होते, केंद्रीय अर्थमंत्रीही बारामतीला येणार आहेत, त्यावर तुमचं मत काय? मी त्यांना सांगितलं, येू द्यात की मग… तुमच्या का पोटात दुखतंय? आम्ही त्यांचं स्वागत करु… पण माझं असंच त्यांनी कुणाला तरी उभं केलं, त्याचं डिपॉझिटच जप्त झालं.. म्हणून तिथे धडका घेऊन काही फायदा होणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.

कन्हेरी मंदिरात नारळ फोडला, पवार ५५ वर्ष हरले नाहीत, त्याच मंदिरात बावनकुळे जाणार, ‘बारामती मिशन’ला सुरुवात
भाजपचं मिशन बारामती..!

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. त्यासाठी विविध केंद्रीय मंत्र्यांवर तथा भाजप नेत्यांवर देशातल्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याच नियोजनातून बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर देण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर सीतारामन २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असतील. दुसरीकडे बारामतीचे प्रभारी म्हणून राम शिंदे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सीतारामन यांच्या दौऱ्याच्या तयारीकरिता सध्या भाजपच्या जोर बैठका सुरु आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here