सांगली : सांगलीत भरधाव जीपचा अपघात होऊन दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. तसंच इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील नांद्रे परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

नांद्रे येथील सांगली मार्गावर असणाऱ्या दर्गाह चौक येथे मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव जीपला अपघात झाला. सांगलीहून खटावकडे भरधाव वेगाने जात असताना ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने दर्गाह समोरील बाहुबले यांच्या घरासमोरील लोंखडी पोलवर जीपने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की लोखंडी पोल वाकवत गाडी फरफटत जाऊन दर्गाहाच्या भिंतीवर अदळली. या अपघातात २१ वर्षीय दोन तरूण (रा. खटाव) हे जागीच ठार झाले आहेत.

बारामतीला धडका मारुन काय होणार? तिथे उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होतंय: अजित पवार

दरम्यान, अपघातातील जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here