cyrus mistry accident case: अहमदाबादहून मुंबईला येत असताना चारोटी टोलनाक्याजवळ मिस्त्रींच्या मर्सिडीज कारला अपघात झाला. या अपघातात मिस्त्रींचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मर्सिडीज कंपनी आणि वाहतूक विभागानं प्राथमिक तपास अहवाल पोलिसांना सोपवला आहे.

अनाहिता यांनी १०० किमी प्रतितास वेगात कार असताना ब्रेक दाबला. त्याआधीही त्यांनी ब्रेक दाबला होता का आणि दाबला असल्यास किती वेळा दाबला? असा प्रश्न पालघर पोलिसांनी मर्सिडीज कंपनीला विचारला. याबद्दलच्या अधिकच्या माहितीसाठी कंपनी कारला १२ सप्टेंबरला आपल्या शोरूममध्ये नेईल. तिथे हाँगकाँगहून कंपनीची एक टीम येईल. ती कारचं निरीक्षण करेल. यानंतर सविस्तर अहवाल देण्यात येईल. हाँगकाँगहून येणाऱ्या टीमनं भारताच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे. मात्र ४८ तासांत व्हिसा न मिळाल्यास भारतात असलेली मर्सिडीज कंपनीची टीमच कारचं निरीक्षण करेल.
कारला अपघात झाला त्यावेळी चार एअरबॅग्स उघडल्या होत्या, असं वाहतूक विभागानं अहवालात नमूद केलं आहे. कारमधील एकूण ४ बॅग्स उघडल्या. यापैकी ३ एअरबॅग्स चालकाच्या समोर आणि एक डोक्याजवळ उघडली. तर एक एअरबॅग चालकाच्या शेजारच्या सीटसमोर उघडली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.