मुंबई: युवासेनेचे पदाधिकारी आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले अमेय घोले हे शिंदे गटात सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच अमेय घोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून अमेय घोले (Amey Ghole) हे शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. यासंदर्भात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना विचारणा करण्यात आली. आदित्य ठाकरे गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अमेय घोले शिंदे गटात जाणार असल्याचा दावा साफ फेटाळून लावला.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात खुलासा करताना म्हटले की, चर्चा यात होत असतात. पण अमेय घोले हे माझ्यासोबत असतात, आजुबाजूला असतात. त्यामुळे या चर्चांना अर्थ नाही. अशा चर्चा किंवा अफवा खूपदा उठत असतात, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. त्यावर प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधींनी अमेय घोले यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केल्याचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा आदित्य यांनी म्हटले की, अमेय घोले त्याठिकाणी कसे पोहोचले, त्यांना तिथे कसे नेण्यात आले? त्यांच्या घरी तेव्हा कुठली यंत्र बसली होती, हे त्यांनाच विचारा, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आदित्य ठाकरे यांच्या या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
Aditya Thackeray : सत्तेत असताना मी आदित्य ठाकरे यांचं ऑफिसही बघू शकलो नाही, आमदाराची जोरदार टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सध्या गणेश दर्शन दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील गणेश मंडळांना भेट दिली होती. त्यावेळी वडाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात अमेय घोले यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले होते. तेव्हापासून अमेय घोले युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात सामील होतील, या चर्चेचे जोर धरला आहे.

याकूब मेमनच्या कबरीचा वाद भाजपमधील अंतर्गत संघर्षामुळे उफाळून आलाय: आदित्य ठाकरे
पेंग्विनसेना म्हणत असाल तर मला त्याचा अभिमान वाटतो: आदित्य ठाकरे

भाजपकडून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला पेंग्विनसेना म्हणून डिवचण्यात येते. आदित्य ठाकरे यांच्याच पुढाकाराने राणीच्या बागेत परदेशातून पेंग्विन आणण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, आम्हाला पेंग्विनसेना म्हटले जात असेल तर त्याचा अभिमान आहे. राणीच्या बागेत पेंग्निन आणल्यामुळे पर्यटाकांची संख्या वाढली. त्यामुळे तोट्यात असणारी राणीची बाग फायद्यात आली. त्यामुळे पेंग्विनवरुन चिडवले जात असेल तर मला त्याचा अभिमानच आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

याकूब मेमन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा पलटवार

याकूब मेमनच्या कबरीच्या सुभोभीकरणाची माहिती समोर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी कालपासून हा मुद्दा लावून धरला आहे. आज होत असलेले आरोप हे खोटे आणि घाणेरडे आहेत. मला वाटत नाही की, लोकांना हे आरोप पटतील. धार्मिक वाद निर्माण करायचा म्हणून अशा गोष्टी उकरून काढणे, कितपत योग्य आहे. यामध्ये दोन-तीन गोष्टी लोकांसमोर येणं गरजेचे आहे. याकूब मेमनला दहशतवादी म्हणून फाशी झाली होती तर त्याचं दफन इतक्या मानसन्मानाने का झाले? त्यावेळी इतकी गर्दी का होऊन देण्यात आली? ओसमा बिन लादेनला जशाप्रकारे समुद्रात दफन केले तसेच याकूब मेमनच्या बाबतीत का घडले नाही? याकूब मेमनचा मृतदेह ज्या ट्रस्टकडे देण्यात आला, ती ट्रस्ट खासगी होती. या ट्रस्टने त्यावेळी महानगरपालिकेकडून एनओसी घेतलाच नव्हता. तसेच एखाद्या दफनभूमीतील कबर १८ महिन्यांनी रोटेट करावी लागते. ते २०१६ मध्येच व्हायला पाहिजे होते, ते झालेच नाही. तेव्हा सरकार कोणाचे होते, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here