मुंबई : विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा मुंबई आणि उपनगरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. काही वेळापासून पूर्व मुंबई उपनगर परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि घाटकोपर परिसरामध्ये जोरदार सरी बरसत आहेत. परिणामी लोकल सेवाही विस्कळीत झाली असून कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
दरम्यान, ऐन गणेशोत्सव काळामध्ये झालेल्या पावसामुळे नागरिकांची प्रचंड दैना उडाली आहे.