रत्नागिरीः पुणे- मुंबई यासारख्या मोठ्या शहरांपर्यंत मर्यादित असणारा करोनाचा प्रसार आता इतर जिल्ह्यांतही वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात करोनाचा प्रसार झपाट्यानं वाढताना दिसत आहे. ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात एकाच दिवसात १० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५९ झाली आहे. तर आज ९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळं बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३४३ झाली आहे. बरो होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ७४. ७२ टक्के झाली आहे.

दरम्यान, आज बरे झालेल्या रुग्णास श्वसनाचा त्रास होत असल्यानं पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची पुन्हा चाचणी केल्यानंतर मात्र, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानं त्याला पुन्हा घरी सोडण्यात आलं. रुग्णालयात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १०० झाली आहे तर, आत्तापर्यंत १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाचाः

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांतील २ हे कोकणनगर, रत्नागिरी भागातील आहे. तर १ रुग्ण श्रृंगारतळी, गुहागर येथील आहे. व इतर सात रुग्णांपैकी खेड तालुक्यातील शिवतर येथील १ रुग्ण, २ रुग्ण, तळ, कासारआळी येथील आहेत. तर, १ रुग्ण खवटी आणि देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील १ व कडवई येथील १ रुग्ण आहे. कोकणनगर हा कंटेन्मेंट झोनम्हणून घोषित करण्यात आले आहेत.

वाचाः

ॲक्टीव्ह कन्टेंनमेंट झोन

जिल्ह्यात सध्या ४७ ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यातील ११ गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये १, खेड तालुक्यातील ६ गावं व संगमेश्वर तालुक्यात१, दापोलीमधील ०६ गावांमध्ये, लांजा तालुक्यात ५, चिपळूण तालुक्यात १० गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात ६ आणि मंडणगड मधील १ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत.

संस्थात्मक विलगीकरण

शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – ६, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, कोव्हिड केअर सेंटर पेढांबे २, कोव्हिड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुड, लवेल, खेड – ५, उपजिल्हा रुग्णालय गुहागर-१, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – ८, कोव्हिड केअर सेंटर साडवली संगमेश्वर -२, असे एकूण २६ संशयित कोरोना रुग्ण दाखल केले आहेत आहेत.

होम क्वारंटाईन

मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात येत आहेत. आज अखेर होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या ४७ हजार ८८ इतकी आहे.

वाचाः

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here