नाशिक: नाशिक जिल्ह्यातील वेठबिगार मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. इगतपुरी तालुक्यातील एका अल्पवयीन चिमुरडीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता यातून काही तुटपुंज्या रक्कमेसाठी मेंढपाळ लहान मुलांना संगमनेर परिसरात घेऊन जातात आणि त्यांचा शारीरिक छळ करत त्या मुलांकडून मेंढ्या चारण्याचे काम करून घेत होते. नाशकातील ६ ते ७ मुले गायब झाले असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेत चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, चिमुरडीच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Shepherds in Nashik torture and exploit children)

वेठबिगार मुद्दा कसा आला उघडकीस

उभाडे येथील कातकरी वस्तीमधील तुळसाबई सुरेश आगीवले यांनी तीन वर्षांपूर्वी आपली मुलगी गौरी (वय १०) हिला घरची परिस्थिती जेमतेम असल्याने संशयित आरोपी विकास सीताराम कुदनार रा. शिंदोडी (ता. संगमनेर) याच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात पाठवले होते. संशयिताने काही दिवस चिमुरडीला चांगले सांभाळत असल्याचे भासवले. दि. २७ ऑगस्टच्या मध्यरात्री गौरी हिस उभाडे येथील आगीवले कुटुंबीयांच्या झोपडी वजा राहत्या घराजवळ विकास कुदनार व त्याच्या साथीदारांनी तिला टाकून पलायन केले.

Malegaon Court : महाराष्ट्रासह देशाला हादरवणाऱ्या घटनेचा ११ वर्षांनी लागला निकाल, शिक्षा ऐकताच आरोपी कोसळला
आपल्या घराजवळ कोण आहे हे पाहण्यासाठी तुळसाबाई गेल्या असता त्यांना धक्का बसला. लाल चादरीत गुंडाळून बेशुद्ध अवस्थेत असलेली मुलगी गौरी असल्याचे समजताच हंबरडा फोडला. गौरी हिची तब्येत गंभीर असल्याने तिला रूग्ण वाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सात दिवसांच्या उपचारादरम्यान गौरी हिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीट बेल्टला फाटा, मृत्यूचा वाढला टक्का; अपघातांमध्ये तीन वर्षांत २ हजार ४४६ जणांचा मृत्यू
पोलिसांनी केला घटनेचा सखोल तपास

गौरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील आणखी ६ ते ७ मुले गायब असल्याचे चित्र स्पष्ट झाले. गेल्या तीन वर्षापासून नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील मुलांना आई वडील वर्षाचे तुटपुंजी रक्कम ५ ते १० हजार रुपये घेऊन हे काम करण्यासाठी पाठवत आहेत. या तिन्ही जिल्ह्यातील जवळपास ३० लहान मुलांना या कामासाठी एका एजेंट मध्यामतून विक्री करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. नाशिक आणि नगर पोलीस या संदर्भात चौकशी करत आहेत आणि यात काही जणांना ताब्यात देखील घेतले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यासंधार्भात नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेत आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर खड्ड्यांचे दर्शन; सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दाखल

याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश दिले असून आरोपींना लवकरात लवकर गजाआड करण्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here