लंडन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ढासळल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. महाराणी म्हणून त्यांनी ७० वर्ष ब्रिटनवर राज्य केलं. एलिझाबेथ द्वितीय यांनी तब्बल १५ पंतप्रधानांचा कार्यकाळ अनुभवला.

महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर पुढील प्रक्रिया काय असणार, याबाबत ब्रिटन सरकारकडून संपूर्ण रणनीतीची आखणी करण्यात आली होती. या संपूर्ण प्लॅनला ‘ऑपरेशन लंडन ब्रिज’ असं कोडनेम देण्यात आलं आहे. हे कोडनेम अनेक वर्ष गुप्त ठेवण्यात आले होते, मात्र याबाबतची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

‘लंडन ब्रिज इज डाऊन’

महाराणीच्या निधनानंतर नियमानुसार पंतप्रधान लिज ट्रस यांना एका फोन कॉलद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. एका सरकारी अधिकाऱ्याने कोडद्वारे ट्रस यांना परिस्थिती माहिती दिली. ‘लंडन ब्रिज इज डाऊन’ असं सरकारी अधिकाऱ्याकडून लिज ट्रस यांना सांगितलं गेलं. त्यानंतर न्यूजफ्लॅशच्या आधारे महाराणीच्या निधनाची बातमी दिली गेली. आता प्रिंस चार्ल्स यांच्या नावाची नवा राजा म्हणून घोषणा केली जाणार आहे.

Weather Forecast : गणरायाच्या विसर्जनासाठी पावसाचीही जोरदार तयारी, हवामान विभागाने दिला इशारा

६५ वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

महाराजा जॉर्ज षष्ठम यांचं निधन झालं तेव्हा ‘हाइड पार्क कॉर्नर’ या कोडचा वापर करण्यात आला होता. ६ फेब्रुवारी १९५२ रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी महाराजांचं निधन झालं होतं. मात्र बीबीसीने याबाबत ११ वाजून १५ मिनिटांनी वृत्त प्रसारित केलं होतं. परंतु ३१ ऑगस्ट १९९७ रोजी जेव्हा पॅरिसमध्ये प्रिंसेस डायना यांचं पहाटे ४ वाजता निधन झालं, तेव्हा परराष्ट्र मंत्री रॉबिन कूक यांच्यासोबत गेलेल्या काही पत्रकारांना १५ मिनिटांतच याबाबतची माहिती मिळाली होती. दरम्यान, महाराणीच्या मृत्यूनंतर सगळ्यात आधी प्रेस एसोसिएशनने वृत्त प्रसारित केलं आणि त्यानंतर जगभरातील माध्यमांना याबाबतची माहिती देण्यात आली.

तळोजा येथील मोदी फेम कंपनीत भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

सरकार नेमकं काय करणार?

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर बीबीसी, १, २, आणि ४ ला रोखलं गेलं. तसंच ब्रिटनच्या संसदेसह स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दन आयर्लंडची संसद स्थगित केली जाईल. सर्व सरकारी संकेतस्थळांवरही काळे बॅनर्स दिसतील.

१० दिवसांनंतर अंत्यसंस्कार

महाराणींच्या पार्थिवावर १० दिवसानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधानांच्या वतीने एक संदेश जारी केला जाईल. पंतप्रधानांचा संदेश येण्याआधी सरकारमधील कोणताही मंत्री वक्तव्य देणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. देशभरात एक मिनिटाचे मौन ठेवण्यात येईल आणि नवीन राजा प्रिन्स चार्ल्स यांच्यासह पंतप्रधान ट्रस नागरिकांना संबोधित करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here