अमळनेर शहरातील मुंबई गल्लीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली. योगिता चौधरी असे मयत विवाहितेचे तर देविदास उर्फ सूर्यकांत आत्माराम चौधरी असे तिच्या संशयित पतीचे नाव आहे.

धक्कादायक बाब म्हणजे वर छताला कुठेच दोरी लटकलेली अथवा तुटलेली दिसली नाही. योगिताने गळफास घेतला. त्यानंतर ती जमिनीवर पडली, असे सूर्यकांतने सांगितले होते. मात्र वरून पडल्याने लागलेल्या काहीच जखमा अथवा चिन्हे दिसली नाहीत. त्यामुळे योगिताचा खून झाल्याची खात्री तिचा भाऊ दिनेशला झाल्याने त्याने रात्री उशिरा अमळनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार पती सूर्यकांत विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीचा गैरसमज दूर करण्यासाठी आली अन् पतीने तिलाच संपवले
देविदास उर्फ सूर्यकांत याला दारूचे व्यसन असून तो मजुरी करतो. मुलबाळ नसल्याने तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता. दोन-तीन दिवसांपूर्वी योगिता सूरत येथे मामाच्या घरी गेली असताना पतीने नातेवाईकांकडे तिची बदनामी सुरू केली. गैरसमज दूर करण्यासाठी योगिता पुन्हा पतीकडे परत आली होती. पोलिसांच्या चौकशीतही मयत योगीचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तिचा पती सुर्यकांत यास पहाटे अटक केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.