Pandharpur News : कोरोनाच्या (corona) संकटामुळं गेल्या दोन वर्षापासून गणेशोत्सव (Ganesh utsav) साजरा करता आला नव्हता. मात्र, यावर्षी मोठ्या जल्लोषात उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी प्रशासनानं बाप्पाच्या विसर्जनाची तयारी केली आहे. मात्र, पंढरपूरमध्ये (Pandharpur) गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तयारी केली नाही. त्यामुळं चंद्रभागा नदीत (Chandrabhaga River) गणपती बाप्पाचं विसर्जन करताना नागरिकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे. कारण चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या ही नदी दुथडी भरुन वाहत आहे.
पुणे आणि सातारा जिल्ह्यातील परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं धरणांच्या पामी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं भीमा नदीत उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुलं चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. चंद्रभागेचे पाणी थेट घाटाला लागले आहे. नदी पात्रातील पुंडलीकाचे मंदिर पाण्याखाली गेले आहे. सध्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुलं नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
आज गणेश विसर्जनासाठी नागरिक चांद्रभागेवर येत आहेत. मात्र, आज सकाळी 11 वाजेपर्यंत मुख्य असलेल्या महाद्वार घाटावर देखील प्रशासनाची कोणतीच तयारी नसल्याचे दिसून आले. भाविक या धोकादायक पाण्यात उतरुन बाप्पाचे विसर्जन करत आहेत. याच पद्धतीनं विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक या वाहत्या पाण्यात स्नानासाठी बेधडक उतरत आहेत. त्या भाविकांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन नसल्याने दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे . पाण्याला मोठी ओढ असल्यानं बाप्पाचं विसर्जन करताना एखादी दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळं आज बाप्पा विसर्जन करताना नागरिकांनी स्वतः काळजी घेण्याची गरज आहे.
आज अनंत चतुर्दशी आहे. आज लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटलं जातं. श्री गणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान झाल्यानंतर दहा दिवस लाडक्या गणेशाची पूजा अर्चना केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. या दिवशी अनेक जण उपवासही करतात.
महत्त्वाच्या बातम्या: