मिस्त्रींची कार चारोटी टोलनाका ओलांडून निघाली, तिथला रस्ता तीन लेनचा होता. मात्र जिथे अपघात झाला, त्या पुलाजवळ रस्ता अरुंद होता. पुलावर रस्ता अरुंद असल्यानं कार चालवणाऱ्या अनाहिता पांडोळे गोंधळल्या असाव्यात आणि त्याचमुळे अपघाता झाला असावा, अशी शक्यता राज्य सरकारमधील पायाभूत सुविधांशी संबंधित सुत्रांनी बोलून दाखवली.
मेटेंच्या कारचाही अपघात, मागे बसलेल्या मेटेंचा मृत्यू
मराठा समाजाचे नेते आणि शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या कारला १४ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर त्यांची कार ओव्हरटेक करताना एका कंटेनरला धडकली. कंटेनर मधल्या लेनमधून डावीकडे जात असताना मेटेंच्या कारनं कंटेनरला धडक दिली. त्यात मेटेंचा मृत्यू झाला.
दोन अपघातांमध्ये अनेक साम्य
कारला अपघात झाला त्यावेळी मेटे मागच्या सीटवर बसले होते. पुढच्या सीटवर चालक आणि सुरक्षा रक्षक बसला होता. ते दोघेही अपघातातून वाचले. त्यांनी सीटबेल्ट लावले होते. मागच्या सीटवरील मेटेंचा मात्र अपघातात मृत्यू झाला. मिस्त्री यांची कार डॉ. अनाहिता पांडोळे चालवत होत्या. त्यांच्या शेजारी त्यांचे पती डेरियस शेजारी बसले होते. दोघांनी सीटबेल्ट लावले होते. तर मागच्या सीटवर बसलेल्या मिस्त्री आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या जहांगीर यांनी सीटबेल्ट लावले होते. मिस्त्री आणि जहांगीर यांचा अपघातात मृत्यू झाला.