Amravati Girl missing | अमरावतीचं संपूर्ण प्रकरण लव्ह जिहादच असल्याचं भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठासून सांगितलं. मात्र पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतल्यानंतर तिचा साताऱ्यात आणि अमरावतीत जबाब नोंदवला. यावेळी मुलीने माझ्यासोबत कोणताही प्रकार अनुचित प्रकार घडला नसल्याचं सांगितलं. मी माझ्या काही वैयक्तिक कारणांनी गेली होती.

हायलाइट्स:
- तुम्ही जिथे जाता तिकडे पोलीस सुरक्षा घेऊन फिरता
- तुमच्यासोबत जे पोलीस कर्मचारी फिरतात
- पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्याच्या स्थानापर्यंत मेहनत करून पोहोचला आहे
तुम्ही जिथे जाता तिकडे पोलीस सुरक्षा घेऊन फिरता. मात्र, तुम्हाला ही सुरक्षा घेण्याचा अधिकार नाही. तुमच्यासोबत जे पोलीस कर्मचारी फिरतात, ते शासनाचे आहेत. प्रत्येक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्याच्या स्थानापर्यंत मेहनत करून पोहोचला आहे. तुमच्यासारख्या लोकांना किराणा वाटून त्याने हे पद मिळवलेले नाही. आजपर्यंत प्रत्येकवेळी तुम्हाला सण-उत्सवांवेळी पोलीस संरक्षण लागते. तुम्ही पोलीस ठाण्यात वापरलेली भाषा योग्य नाही. आम्हाला माहिती आहे की, आमचे पती दिवसरात्र ड्युटी करतात, सणाच्या दिवशीही आमच्यासोबत नसतात आणि तुम्ही त्यांच्याविरोधात अशी भाषा वापरता. तुम्ही हा माज कमी करा. तुम्ही स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणवता. लोकप्रतिनिधीची भाषा अशी नसते, ते प्रेमाने बोलतात. पोलीस अधिकारी हे त्यांच्या मेहनतीने इथवर पोहोचले आहेत, त्यांच्या पदाला एक प्रतिष्ठा आहे, असे या पोलिसाच्या पत्नीन म्हटले.
यावेळी नवनीत राणा यांचा निषेध करण्यासाठी पोलीस कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर रस्तावर उतरले होते. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे हे त्यांनी टाळावं व त्यांनी तात्काळ पोलिसांची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस भरती संघटनेच्यावतीने करण्यात आली.
नवनीत राणा तोंडघशी पडल्या
अमरावतीच्या कथित लव्ह जिहाद आरोप प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे. ज्या प्रकरणावरुन खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जोरदार राडा केला, गोंधळ घातला, प्रसंगी पोलिसांसमोरच २० मिनिटे थयथयाट केला. त्याच प्रकरणातल्या मुलीने नवनीत राणा यांनी माझी बदनामी केली, असा गंभीर आरोप केलाय. काल संबंधित मुलीने पोलिसांकडे जबाब नोंदवताना ‘लव्ह जिहाद’वगैरे असा काही प्रकार नसल्याचं सांगत माझ्या वैयक्तिक कारणांनी मी घर सोडून निघून गेले होते, असं सांगून राणांना तोंडघशी पाडले आहे. तसेच नवनीत राणा यांच्यावर बदनामीचा आरोप करुन त्यांना आणखीनच अडचणीत आणले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.