मुंबई : बाॅलिवूड खिलाडी अक्षय कुमारचे सिनेमे सध्या चालत नाहीत. बच्चन पांडे, रक्षाबंधन, अतरंगी रे, सम्राट पृथ्वीराज सगळे एकापाठोपाठ फ्लाॅप झाले आहेत. पण याचा त्याच्या आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम झालेला नाही. त्याची आलिशान घरं, एकूण संपत्ती यावर टाकू या एक नजर.

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक शिकलेल्या अभिनेत्रीमध्येही मराठीचाच डंका, नाव वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

अक्षय कुमारचा बंगला आहे आलिशान
अभिनेता एका आलिशान बंगल्यात राहतो. तिथून जुहू बीच चांगलाच दिसतो. त्याच्या घरातच मोठा बगीचा आहे. तिथे बसण्याची सुविधा आहे. अनेकदा अक्षयची पत्नी ट्विंकल तिथले फोटो शेअर करत असते.

त्याच्या बागेत फळाफुलांची असंख्य झाडं आहेत. अनेकदा अक्षय तिथे बागकाम करताना दिसतो. शिवाय त्याची एक स्टडी रूमही आहे. ती एकदम ऐसपैस आहे.

अक्षय कुमारची स्टडी रूम

अक्षय कुमारकडे बरीच घरं
बंगल्याशिवाय मुंबईत अक्षयचं आणखी एक डुप्लेक्स घर आहे. त्याची किंमत जवळपास ७.८ कोटी रुपये आहे. ते छान सजवलंय. अंधेरीला Transcon Triumph Tower मध्ये त्यानं चार फ्लॅट खरेदी केले आहेत. गोव्यात एक व्हिला आहे आणि माॅरिशसलाही समुद्राला लागून बंगला आहे.

अक्षय कुमारची नेटवर्थ ऐकून बसेल धक्का
अक्षय कुमारची एकूण संपत्ती bollymoviereviewz अनुसार ३४० मिलियन डाॅलर आहे. भारतीय रुपयात २७,०६,५३,६०,००० कोटी आहे. त्याचं स्वत:चं प्राॅडक्शन हाऊसही आहे. Hari Om Entertainment Co हे त्याचं नाव. शिवाय अक्षयची कबड्डी टीमही आहे. अक्षय महिन्याला ५० कोटींपेक्षा जास्त कमाई करतो.

देख रहा है बिनोद, शाहरुखला ब्रह्मास्त्रमध्ये पाहून आपटला डोकं

अक्षयने त्याच्या या आगामी सिनेमासाठी मागील सर्व चित्रपटांहून अधिक फी घेतली आहे. राम सेतू सिनेमासाठी त्याने १३५ कोटी रुपये मानधन घेतलं असल्याची माहिती आहे. सलग फ्लॉप सिनेमे देऊनही अक्षयच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये कोणतीही कमी झालेली नाही. सम्राट पृथ्वीराज सिनेमानंतर अक्षयने आपल फी कमी केल्याचं बोललं जात होतं, मात्र असं झालेलं नाही. चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले असले, तरी अक्षयची फी वाढतच राहिली. राम सेतू सिनेमा यावर्षात ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे.

थायलंडचे गणेशभक्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी लीन, बाप्पाची आरतीही म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here