जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील १७ वर्षीय मुलाचा गणपती विसर्जन करताना पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २ वाजता घडली आहे. विसर्जन करताना घडलेली ही जळगाव जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. सौरभ शत्रुघ्न मोरे (वय-१७) असं मृत युवकाचे नाव आहे.

चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावात राहणारा सौरभ शत्रुघ्न मोरे (वय-१७) हा आपला भाऊ व आई यांच्यासह वास्तव्याला आहे. लहान मुलांच्या गणपती मंडळात सौरवने भाग घेतला होता. दरम्यान, आज गणेश विसर्जनाच्या कार्यक्रम असल्याने तीन मित्रांसोबत अंबुजा कंपनीच्या मागे असलेल्या डोहात गणपती विसर्जनासाठी तो गेला होता. सौरवने गणपती बुडविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. यावेळी सोबत असलेले दोन मित्र डोहाच्या बाहेर उभे होते.

सौरभला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बडून मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर दोन्ही मित्रांनी आरडाओरड केली. यावेळी खदानीच्या बाजूला काम करणाऱ्या कामगारांनी धाव घेतली. कामगारांच्या मदतीने सौरभला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याने प्राण सोडले होते.

Weather: राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला अलर्ट

दरम्यान, गणपती विसर्जनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सौरभ मोरे याच्या पश्चात आई कल्पनाबाई, भाऊ भूषण असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here