नवी दिल्ली: कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीने (BJP) २०२४ साली होऊ घातलेली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. त्यासाठी भाजपकडून १५ राज्यांमध्ये प्रभारी आणि सहप्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे बिहारचे प्रभारीपद देण्यात आले आहे. यापूर्वी ते हरियाणाचे प्रभारी होते. नितीश कुमार यांनी साथ सोडल्यामुळे भाजपने नुकतीच बिहारमधील सत्ता गमावली होती. त्यामुळे आता विनोद तावडे बिहारमध्ये सत्ता पुन्हा खेचून आणण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहावे लागेल.
शाहांसोबत जवळीक वाढली, फडणवीसांच्या पुढे पावलं, अडीच वर्षांनी विनोद तावडे फ्रंट सीटवर
तर भाजपमध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना थेट मध्य प्रदेशात धाडण्यात आले आहे. त्यांच्यावर मध्य प्रदेशच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर डाव्यांचा गड मानल्या जाणाऱ्या केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी ही माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिपदावरून बाजुला सारल्यापासून प्रकाश जावडेकर हे फारसे सक्रिय नव्हते. मात्र, आता भाजपने त्यांना आणखी एक संधी देऊ केली आहे. तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यावर भाजपने राजस्थानच्या सहप्रभारीपदाची धुरा दिली आहे. सध्याच्या घडीला भाजपच्या ताब्यात नसणाऱ्या मोजक्या राज्यांपैकी एक म्हणून राजस्थानाची ओळख आहे. याठिकाणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन लोटस’च्या प्रयत्नानंतरही मोठ्या कौशल्याने काँग्रेसची सत्ता राखली आहे. त्यामुळे विजया रहाटकर याठिकाणी काही चमत्कार करून दाखवतात का, हे पाहावे लागेल.

Pankaja Munde : कमळ सोडा, घड्याळ बांधा; पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर
भाजपच्या राज्यनिहाय प्रभारी आणि सह-प्रभारींची यादी खालीलप्रमाणे

* बिहार- विनोद तावडे (प्रभारी), हरीश द्विवेदी (सहप्रभारी)

* छत्तीसगढ- ओम माथूर (प्रभारी), नितीन नवीन (सहप्रभारी)

* दादरा-नगर हवेली आणि दीव-दमण- विनादे सोनकर (प्रभारी)

* हरियाणा- बिप्लब कुमार देव

* झारखंड- लक्ष्मीकांत वाजपेयी

* केरळ- प्रकाश जावडेकर

* लक्षद्वीप- राधामोहन अग्रवाल

* मध्य प्रदेश- मुरलीधर राव, पंकजा मुंडे (सहप्रभारी), रमाशंकर कठोरिया (सहप्रभारी)

* पंजाब- विजय रुपाणी (प्रभारी), नरिंदर रैना (सहप्रभारी)

* तेलंगणा- तरुण चुघ (प्रभारी), अरविंद मेनन (सहप्रभारी)

* चंदीगढ- विजय रुपाणी (प्रभारी)

* राजस्थान- अरूण सिंह (प्रभारी), विजया राहटकर (सहप्रभारी)

* त्रिपुरा- महेश शर्मा

* पश्चिम बंगाल- मंगल पाण्डेय (प्रभारी), अमित मालवीय (सहप्रभारी), आशा लकडा (सहप्रभारी)

* ईशान्य भारत प्रदेश- सांबित पात्रा (प्रभारी), रितुराज सिन्हा (सहप्रभारी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here