ठाणे : ठाण्यातील कोलबाड येथील कोलबाड मित्र मंडळ या सार्वजनिक गणपती मंडळाच्या मंडपावर आणि दोन गाड्यांवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण ५ जण जखमी झाले असून यातील तिघांना किरकोळ जखम झाली असून अन्य २ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींची नावे:
१) राजश्री वालावरकर (अंदाजे वय ५५ वर्ष)
२) प्रतिक वालावरकर (अंदाजे वय ३० वर्ष)
या दोघांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
३) कीविन्सी परेरा (४०)
४) सुहासिनी कोलुंगडे (५६ वर्ष)
५) दत्ता जावळे (५० वर्ष) हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत.