पनवेल : पनवेलमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट लागलं असून विसर्जन करत असताना इलेक्ट्रिक शॉकने ११ भाविक जखमी झाले आहेत. शहरातील वडघर खाडी परिसरात ही दुर्घटना घडली आहे. यातील सर्व जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच काही जखमींना पनवेलमधील लाइफ लाइन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्यातील इतर भागांमध्येही आज गणेश विसर्जन करताना दुर्घटना घडल्याचं समोर आलं. जळगावमध्ये गणेश विसर्जन करताना बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तसंच धुळ्यातही एका तरुणाने प्राण गमावले आहेत.