ganesh immersion rally: देशभरात गेल्या १० दिवसांत गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. गणेश भक्तांनी काल साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला. काही ठिकाणी विसर्जनाला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या. नवी मुंबईच्या पनवेलमध्ये इलेक्ट्रिक शॉक लागून ११ जण जखमी झाले. तर मध्य प्रदेशच्या निवाडी जिल्ह्यात विसर्जनादरम्यान धक्कादायक घटना घडली.

 

boy dies
निवाडी: देशभरात गेल्या १० दिवसांत गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. गणेश भक्तांनी काल साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला. काही ठिकाणी विसर्जनाला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या. नवी मुंबईच्या पनवेलमध्ये इलेक्ट्रिक शॉक लागून ११ जण जखमी झाले. तर मध्य प्रदेशच्या निवाडी जिल्ह्यात विसर्जनादरम्यान धक्कादायक घटना घडली.

निवाडीत विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या वाहनाखाली आल्यानं आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गाण्यांच्या मोठ्या आवाजात मुलाचा आवाज कोणालाच ऐकू आला नाही. पोलिसांनी डीजे लावण्यात आलेलं वाहन जप्त केलं आहे. निवाडी जिल्ह्यातील ओरछा इथे ही घटना घडली.
मोठी दुर्घटना: गणेश विसर्जन करताना इलेक्ट्रिक शॉकने तब्बल ११ भाविक जखमी
ओरछाच्या नरियामध्ये गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गुरुवारी बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. त्यावेळी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत डीजे होता. एकूण तीन वाहनांवर डीजे लावण्यात आला होता. या गाण्यांवर तरुणाई थिरकत होती.
ठाण्यात दुर्घटना: सार्वजनिक गणपतीच्या मंडपावर झाड कोसळले; एका महिलेचा मृत्यू, ४ जखमी
आठ वर्षांचा हर्ष जोशी डीजे लावण्यात आलेल्या वाहनाच्या चाकाखाली आला. चाकाखाली सापडताच हर्षनं आक्रोश केला. मात्र गाण्यांचा आवाज अतिशय जास्त असल्यानं त्याचा आक्रोश कोणालाच ऐकू आला नाही. वाहन हर्षवरून गेल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी हर्षला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिलं. त्याला लगेचच आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला झाशीला नेण्यास सांगितलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हर्षच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here