man takes mothers dead body by wheelchair: तमिळनाडूच्या त्रिचीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ६० वर्षांच्या वृद्ध मुलानं आपल्या आईचा मृतदेह व्हिलचेअरवर ठेऊन स्मशानभूमी गाठली. मणप्पराई परिसरात वास्तव्यास असलेल्या मुरुगानंदन यांच्याकडे आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते. व्हिलचेअर ढकलत ढकलत त्यांनी दीड किलोमीटर अंतर कापलं.

 

60 year old
त्रिची: तमिळनाडूच्या त्रिचीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ६० वर्षांच्या वृद्ध मुलानं आपल्या आईचा मृतदेह व्हिलचेअरवर ठेऊन स्मशानभूमी गाठली. मणप्पराई परिसरात वास्तव्यास असलेल्या मुरुगानंदन यांच्याकडे आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते. व्हिलचेअर ढकलत ढकलत त्यांनी दीड किलोमीटर अंतर कापलं. आई बऱ्याच काळापासून आजार होती. त्यामुळे कोणीच मदत करणार नाही, असा विचार करून मुरुगानंदन एकटेच आईचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत पोहोचले.

स्मशानभूमीत काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मुरुगानंदन यांनी त्यांची व्यथा मांडली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आईवर अंत्यसंस्कार केले आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळवून देण्यासही मदत केली. मुरुगानंदन पेशानं इलेक्ट्रिशन आहेत. मात्र काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली आहे. आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरसे पैसे नसल्याची आपबिती त्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली. त्यामुळे मुरुगानंदन यांच्या आईवर अंत्यसंस्कार होऊ शकले.
कॉकटेल पिताच दरदरून घाम फुटला, श्वास गुदमरला; तरुणाचा करुण अंत, डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं
मुरुगानंदन यांच्या आई राजेश्वरी (८४) यांच्यावर अनेक वर्षांपासून उपचार सुरू होते. त्यांना सोरायसिसचा त्रास होता. बुधवारी राजेश्वरी यांची प्रकृती खालावली. त्यांनी कुटुंबियांना राजेश्वरी यांना घरीच उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास राजेश्वरी यांचं निधन झालं.
विसर्जनाला गालबोट; मुलगा डीजे लावलेल्या वाहनाखाली आला; जिवाच्या आकांतानं आक्रोश; पण…
मुरुगानंदन आईचा मृतदेह व्हिलचेअरवर ठेऊन स्मशानभूमीत पोहोचले. त्यांच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र नव्हतं. ते मिळवून देण्यात स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली. मुरुगानंदन यांच्या कुटुंबात वडील पेरियासामी (९० वर्षे) आणि दोन भाऊ आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here