माद्रिद: पबमध्ये कॉकटेल प्यायल्यानंतर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. १८ वर्षांचा तरुण पार्टीसाठी मित्रांसोबत पबमध्ये गेला होता. तिथे कॉकटेल प्यायल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ते पाहून त्याच्या मित्रांना जबर धक्का बसला.

ब्रिटनमध्ये राहणारा शिव मिस्त्री सुट्टी घालवण्यासाठी स्पेनला गेला होता. मित्रांसाठी पार्टी करण्यासाठी शिव एका पबमध्ये गेला. तिथे तो कॉकटेल प्यायला. कॉकटेल पिताच त्याला घाम फुटला. त्याचा श्वास कोंडला. त्यानंतर शौचालयात जाऊन त्यानं उलटी केली. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केलं.
विसर्जनाला गालबोट; मुलगा डीजे लावलेल्या वाहनाखाली आला; जिवाच्या आकांतानं आक्रोश; पण…
शिव मिस्त्रीनं केंब्रिज विद्यापीठाच्या क्लेयर महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तिथे तो वैद्यकशास्त्राचा अभ्यास सुरू करणार होता. मात्र स्पेनमध्ये कॉकटेल प्यायल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना जुलैमध्ये घडली. मात्र ती आता उघडकीस आली आहे. शिव स्पेनमध्ये पिना कोलाडा कॉकटेल प्यायला. शिवला लहानपणापासून डेयरी उत्पादनांची ऍलर्जी होती, अशी माहिती त्याचे काका कल्पेश मिस्त्री यांनी दिली. शिवनं प्यायलेल्या कॉकटेलमध्ये नारळाच्या क्रीमच्या जागी गायीचं दूध होतं.

कॉकटेल प्यायल्यानंतर शिवच्या शरीरावर परिणाम झाला. कॉकटेल प्यायल्यामुळे झालेली रिऍक्शन शिवसाठी जीवघेणी ठरली. शिवला त्याचे मित्र स्पेनच्या फुएनगिरोलातील एका पबमध्ये घेऊन गेले होते. कॉकटेल प्यायल्यानंतर शिवला घाम फुटला. त्याच्या श्वासांचा वेग वाढला. त्यानं बाथरूममध्ये जाऊन उलटी केली.
बचत गटवाल्यांमुळे बायकोची आत्महत्या! पतीची पोलिसांना माहिती, मेहुण्याला शंका आली अन्…
शिवची प्रकृती बिघडताच त्याच्या मित्रांनी आपत्कालीन सेवेला फोन केला. शिवनं मित्रांकडे इपिपेन नावाचं इंजेक्शन आणि इनहेलर मागितलं. शिवच्या मित्रांनी त्याला २० मिनिटं सीपीआर दिला. घटनेची माहिती शिवच्या आई, वडिलांना देण्यात आली. त्यांनी त्याच्या मित्रांना इपिपेन देण्यास सांगितलं. शिवची तब्येत खालावत असल्याचं पाहून त्याला मारबेलातील कोस्टा डेल सोल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here