वाचा:
जून महिन्याच्या सुरुवातील आलेल्या निसर्ग वादळाने रायगड जिल्ह्यात घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घरांची छपरे उडाली. विजेचे खांब कोसळून पडले. त्यामुळं अनेक गावे अंधारात गेली. गर्द झाडीत वसलेले तालुक्यातील लेप गावही काळोखात बुडून गेले. एरवी छोट्याशा पावसात आणि वाऱ्यातही वरचेवर वीज पुरवठा खंडित होण्याचा अनुभव असलेल्या लेप गावकऱ्यांनी चक्रीवादळानंतर वीज लवकर येईल याची आशाच सोडली होती. मात्र, गावातील तरुण मंडळींनी आशा सोडली नव्हती. त्यांनी या समस्येवर उपाय करण्याचे ठरवून कामाला सुरुवात केली.
वाचा:
गावातील मंडळींच्या व्हाट्सअॅप ग्रुपची याकामी मोठी मदत झाली. या ग्रुपवर एकूण १२४ सदस्य आहेत. या सर्वांनी गावातील विजेच्या समस्येवर चर्चा सुरू केली. मुंबई व इतर शहरांमध्ये असलेल्या तरुणांनी त्यात पुढाकार घेतला. सौर ऊर्जेच्या माध्यमातून गावात लाइट आणण्याचा निर्णय झाला. त्यासाठी मतभेद विसरून पैसे उभे करायचे ठरले आणि अवघ्या दोन दिवसांत ५० हजार रुपये जमा झाले. त्यानंतर सोलार कंपनीशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्याकडून कोटेशन घेण्यात आले. गावातील एका सदस्याने त्याच्या सोसायटीतून २० हजार रुपये जमा केले.
लेप गावची संख्या अंदाजे ५०० आहे. एका सोलार किटमध्ये ३ बल्ब, १ टॉर्च, एफएम, स्पीकर आहे. गावातील २५ घरांमध्ये सोलार किट वाटण्यात आले आणि गाव पुन्हा एकदा प्रकाशाने उजळून निघाले. गावातील तरुण मंडळींनी पुढाकार घेऊन केलेल्या या कामाबद्दल ज्येष्ठ मंडळींनी समाधान व्यक्त केले आहे.
वाचा:
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines