गढवा: झारखंडच्या दुमकानंतर गढवा येथील बन्सीधर नगरात तरुणाला पेट्रोल टाकून पेटवण्यात आल्याची घटना घडली आहे. उंटारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चित्तविश्राम गावात हा प्रकार घडला. तरुण गंभीररित्या भाजला आहे. त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला इजा झाली आहे. तरुणाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

दीपक सोनी (वय ३७ वर्षे) असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. चित्तविश्राम गावात दोन तरुणांचा वाद सुरू होता. भांडण सोडवण्यासाठी दीपक पुढे सरसावला. त्यानं मध्यस्थीचा प्रयत्न केला. त्यावेळी भांडत असलेल्या एका तरुणानं दीपकवर पेट्रोल टाकलं. आमचं भांडण सोडवणारा तू कोण, असा प्रश्व विचारत तरुणानं दीपकला पेटवून दिलं. घटनेची माहिती मिळताच उंटारी पोलीस ठाण्याचे प्रभारी योगेंद्र कुमार घटनास्थळी पोहोचले.
नांदेडच्या जंगलात तरुणाची निर्घृण हत्या; मृतदेहाजवळ लिंबं, तांब्या अन् फुलं; नरबळीचा संशय
तरुणावर पेट्रोल टाकून त्याला पेटवण्यात आल्याची घटना समोर आली असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती उंटारीचे पोलीस निरीक्षक राजेश कुमार यांनी दिली. दीपक सोनीनं भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न केला. भांडण करणाऱ्या तरुणानं दीपकला मारहाण करण्यास सुरुवात केली. मग त्यानं दीपकवर पेट्रोल टाकलं, असं कुमार यांनी सांगितलं.
खंडणी न दिल्यानं चिमुरड्याचं अपहरण करून हत्या; पडक्या इमारतीवर आढळला मृतदेह; पिंपरीत खळबळ
याआधी २३ ऑगस्टला दुमकामध्ये अंकिता नावाच्या तरुणीला पेट्रोल टाकून पेटवण्यात आल्याची घटना घडली. रिम्समध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी शाहरुख आणि नईम या दोन आरोपींना अटक केली आहे. दुमका नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३४, १२० बी आणि पॉस्को कायद्याच्या कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here