मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सव काळात अनेक मंडळांना भेटी दिल्या. गणेशोत्सवामुळे नेते मंडळींना सर्वसामान्यांना भेटण्याची चांगली संधी मिळते. त्याचा पुरेपूर लाभ शिंदेंनी घेतला. या कालावधीत शिंदेंनी दररोज जवळपास ५० ते ६० मंडळांना भेटी दिल्या. येत्या काही महिन्यांत राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी गणेशोत्सवाचा वापर जनसंपर्क वाढवण्यासाठी केला.

गणेशोत्सवात मुख्यमंत्र्यांनी दररोज जवळपास ५० ते ६० मंडळांना भेट दिल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. गेल्या १० दिवसांत मुख्यमंत्री खूप फिरले. अनेक मोठ्या मंडळांसह त्यांनी सोसायट्यांच्या बाप्पांचंही दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळांना भेटी देऊन दोन प्रमुख साध्य केले.
खासदार कीर्तिकर करणार होते शिंदे गटात प्रवेश, मात्र मुलाने कान टोचताच पिताश्री विरघळले
मुंबई, पुण्यातील गणेशोत्सव मंडळांमध्ये जाऊन शिंदेंनी बाप्पांचं दर्शन घेतलं. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या वर्षाच्या अखेरपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत ठाकरेंचे कट्टर समर्थक आहेत. त्यांची मातोश्रीवर निष्ठा आहे. मुंबईतला वावर वाढवून शिंदेंनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं समजतं. ठाकरेंचं वर्चस्व असलेल्या मुंबईत शिंदे पूर्णपणे सक्रीय झाल्याचा संदेश या मंडळ भेटींनी दिला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर काही महिन्यांत करोनामुळे परिस्थिती बिघडली. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक निर्बंध लादले गेले. त्यामुळे ठाकरे फारसे घराबाहेर पडले नाहीत. यावरून भाजपनं त्यांच्यावर तोफ डागली होती. घरात बसणारे, वर्क फ्रॉम होम करणारे मुख्यमंत्री अशा शब्दांत ठाकरेंवर शरसंधान साधलं आहे. आपण ठाकरेंपेक्षा वेगळे असून लोकांमध्ये मिसळतो, हादेखील संदेश शिंदेंनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिला.
दगडूशेठ मंदिरात शिरताच अजितदादा थबकले, सुरक्षा रक्षकाकडून नोटा घेऊन दर्शनाला
शिंदे गटानं मुंबई महापालिकेची तयारी सुरू केल्यानं गणेशोत्सव काळात स्पष्टपणे दिसून आलं. मुंबईत विधानसभेचे एकूण ३६ मतदारसंघ आहेत. पैकी १४ मतदारसंघात शिवसेनेनं गेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. सेनेच्या १४ पैकी ५ आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अनेक आमदार आजही ठाकरेंशी एकनिष्ठ आहेत. वर्षाअखेरपर्यंत होणारी महापालिकेची निवडणूक ठाकरे आणि शिंदेंसाठी महत्त्वाची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here