famous youtuber of aurangabad goes missing: प्रसिद्ध यूट्यूबर अचानक बेपत्ता झाली आहे. काल दुपारपासून ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र अद्यापही तिचा शोध लागलेला नाही. मुलगी कुठेही दिसल्यास संपर्क साधण्याचं आवाहन आई वडिलांनी केलं आहे.

 

youtuber missing
औरंगाबाद: प्रसिद्ध यूट्यूबर अचानक बेपत्ता झाली आहे. काल दुपारपासून ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र अद्यापही तिचा शोध लागलेला नाही. मुलगी कुठेही दिसल्यास संपर्क साधण्याचं आवाहन आई वडिलांनी केलं आहे.

काल दुपारी २ वाजल्यापासून यूट्यूबर बेपत्ता आहे. ती घरी न आल्यानं कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रांकडे तिची विचारपूस केली. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी आज छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. छावणी पोलीस आणि सायबर क्राईम विभाग तिचा शोध घेत आहे.
अरे तू कोण आमचं भांडण सोडवणारा? वाद मिटवायला गेलेल्या तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं
पडेगावात राहणाऱ्या यूट्यूबरचे ४३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या अनेक व्हिडीओंना हजारो लाईक्स मिळतात. प्रसिद्ध यूट्यूबवर अल्पवयीन आहे. २४ तास उलटून गेल्यानंतर तिचा शोध न लागल्यानं आई वडील चिंतेत आहेत. आम्हाला कोणीच मदत करत नाहीए. आमची मुलगी कुठे दिसली तर कृपया संपर्क साधा. आमच्या मुलीला कोणी ओळखणार नाही, असं होऊ शकत नाही. आम्हाला वेळीच मदत करा. अन्यथा खूप उशिरा होईल, असं आवाहन तिच्या आई वडिलांनी केलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here