हिंगोली : राज्यात काल गणेश विसर्जन करताना अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. जळगावमध्ये गणेश विसर्जनावेळी बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर धुळ्यातही एकाने जीव गमावला. त्यानंतर आता हिंगोली तालुक्यातील घोटा येथेही अशीच दुर्घटना झाल्याचं समोर आलं आहे. गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कयाधू नदीच्या पाण्यात बुडून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. पुरुषोत्तम संतोष गडगीळ असं या मुलाचं नाव आहे.

या दुर्घटनेबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटा येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजता गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गणेशमूर्तीचे कयाधू नदीमध्ये विसर्जन करण्यासाठी काही तरुण पाण्यात उतरले. यावेळी पुरुषोत्तम हा देखील पाण्यात उतरला. मात्र पुढे पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो खोल पाण्यात बुडाला. त्यानंतर त्याने मदतीसाठी आरडा ओरड केली.

रऊफसोबत बैठकीचा आरोप, पेडणेकरांनी थेट कोश्यारी-फडणवीस-शेलारांचं ‘मेमन’ कनेक्शन दाखवलं!

सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या अंकुश लांभाडे, संकेत शेळके, गणेश गडगीळ, भारत लांभाडे, रवी शेळके यांच्यासह तरुणांनी खोल पाण्यात जाऊन त्याला बाहेर काढले. त्यानंतर पुरुषोत्तम यास तातडीने उपचारासाठी खाजगी वाहनाने हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या घटनेमुळे घोटा गावावर शोककळा पसरली आहे.

मध्यमवर्गीय महिलांसोबत घाणेरडं राजकारण नको, मेमनसोबत व्हिडिओवर बोलताना पेडणेकर रडवेल्या

दरम्यान, मृत पुरुषोत्तम हा हिंगोली येथील एका खाजगी शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. अभ्यासात अत्यंत हुशार व मनमिळावू स्वभावामुळे तो गावातील सर्वांचाच लाडका होता. त्याच्यावर घोटा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्‍चात आई, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here