पिंपरी: शहरातील मासुळकर कॉलनी परिसरात एका सात वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली होती. प्राथमिक माहिती खंडणीसाठी हा खून झाल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांना या घटनेचा उलगडा करण्यात यश मिळाले असून आरोपीने एकतर्फी प्रेमातून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

आदित्य ओगले असे खून झालेल्या मुलाचे नाव असून या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी मंथन किरण भोसले आणि अनिकेत समदुर यांना अटक केली आहे. आरोपींनी भोसरी एमआयडीसी येथील एका पडक्या इमारतीच्या छतावर आदित्य याचा मृतदेह ठेवला होता. याबाबत पिंपरी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी मंथन हा आदित्यच्याच सोसायटीत राहायला आहे. मंथन याचे आदित्यच्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. या प्रेमाला घरातून विरोध होत असल्याने अनेकदा भांडणे देखील झालेली होती. त्याचा राग मनात धरूनच मित्राच्या मदतीने मंथन याने आदित्यच्या अपहरणाचा कट रचला. मंथन याने अपहरण करण्यासाठी मोटारीला टिंटेड ग्लास लावली. आदित्य इमारतीच्या खाली खेळायला येताच त्याने आदित्यला गाडीच्या जवळ बोलवले आणि गाडीच्या जवळ येताच त्याने त्याला गाडीत ओढून त्याचं नाक-तोंड दाबून त्याचा खून केला.

खंडणी न दिल्यानं चिमुरड्याचं अपहरण करून हत्या; पडक्या इमारतीवर आढळला मृतदेह; पिंपरीत खळबळ
आरोपीने यावरच न थांबता त्याने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून त्याने आदित्यच्या घरच्यांच्या मोबाईलवर २० कोटी खंडणी मागण्याचा मेसेज केला. या प्रकरणाचा पिंपरी पोलिसांनी दखल घेत तातडीने तपास करून आरोपींना गजाआड केले आहे.

गुरुवारी सायंकाळी आदित्य हा बाहेर खेळायला जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर बराच वेळ झाला तरी तो घरी न परतल्याने असे वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. तो न सापडल्याने वडिलांनी पिंपरी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत तक्रारीनुसार दोन संशियताना ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल करत केलेल्या दुष्कृत्याची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here