जळगाव : नंदुरबार जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्याप्रकरणी नुकत्याच शिंदे गटात ( Eknath Shinde News ) सहभागी झालेल्या आमदार लता सोनवणे ( Lata Sonawane ) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने आमदार लता सोनवणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या. के. एम. जोसेफ व न्या. ऋषिकेश रॉय यांनी उच्च न्यायालयाचा निकाल कामय ठेवला आहे. यामुळे आमदार लता सोनवणे यांना मोठा झटका बसला आहे. जातप्रमाणपत्रच अवैध ठरल्याने लता सोनवणे यांच्या आमदारकीवरच टांगती तलवार आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून आमदार लता सोनवणे धनुष्यबाण या चिन्हावर अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. आमदार लता सोनवणे यांच्याविरोधात महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी व अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी तक्रार दिली होती. आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे केली होती. समितीने जातप्रमाणपत्र अवैध ठरविले होते.

नंदुरबार जातपडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात आमदार लता सोनवणे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. तेव्हा खंडपीठाने याबाबत चौकशी करून निर्णय घेण्याचे आदेश जातपडताळणी समितीला दिले होते. समितीने पूर्वीचा निर्णय दिल्याने आमदार सोनवणे पुन्हा खंडपीठात गेल्या होत्या. मात्र, खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. खंडपीठाने याचिका फेटाळल्यानतंर आमदार लता सोनवणे यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात शुक्रवारी (९ सप्टेंबर रोजी ) सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या. के. एम. जोसेफ व न्या. ऋषिकेश रॉय यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे.

mla lata sonawane

शिंदे गटातील आमदाराची आमदारकी धोक्यात

‘सर्वोच्च न्यायालयात पुन्हा री-ओपन करण्यासाठी प्रयत्न करणार’

दरम्यान, आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आमदार लता सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी बाजू स्पष्ट केली आहे. आमदारकी कुठेही गेलेले नाही. आमदारकी कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमची याचिका डीसमिस केली आहे. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात ती पुन्हा री ओपन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल, असा विश्वास माजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार थेट अशी आमदारकी जात नाही. त्याची कायदेशीर प्रक्रिया असल्याचेही चंद्रकांत सोनवणे यांनी स्पष्ट केलं.

Aditya Thackeray : सत्तेत असताना मी आदित्य ठाकरे यांचं ऑफिसही बघू शकलो नाही, आमदाराची जोरदार टीका

‘आमदारांविरोधात प्रशासकीय कारवाईसाठी याचिका दाखल करणार’

आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भातील प्रक्रिया ही प्रशासनाची आहे. आता यासंदर्भातील प्रक्रिया निवडणूक आयोग व प्रशासनाची आहे. ती जलद गतीने व्हावी. आदिवासी समाजासाठीची ही जागा राखीव असल्याने मी त्यांच्यासाठी लढा देत होतो. त्याला न्याय मिळालं आहे. तसेच यापूर्वी न्यायालयाचे निकाल तपासले असता, यात निवडणुकीवेळी विजयी आमदाराच्या विरोधात असलेला दोन नंबरचा जो पक्ष असतो तो विजयी ठरतो. यामुळे आता पुढील प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर करावी, या संदर्भातही मी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी दिली आहे.

आईचे काही दिवसांपूर्वीच निधन, दुःखातून सावरत नाही तोच तरुणीसोबत घडलं भयंकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here