Authored by prasad lad | Maharashtra Times | Updated: Sep 10, 2022, 6:54 PM

Pakistan : पाकिस्तानच्या संघाने आता भारताच्या एका प्रशिक्षकाला आपल्याकडे बोलावून घेतले आहे. एकेकाळी भारताला विजय मिळवून देणारा भारताचा प्रशिक्षक आता थेट पाकिस्तानला मदत करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताचा कोणता प्रशिक्षक आता पाकिस्तानला मदत करणार आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आता सर्वांनाच असणार आहे. त्यामुले हा प्रशिक्षक कोण जाणून घ्या…

 

team india
सौजन्य-ट्विटर
नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धेची फायनल आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामध्येच आता भारताचा कोच आता पाकिस्तानला विजय मिळवून देण्यासाठी मदत करणार असल्याचे समोर आले आहे.


एकेकाळी भारताला विजय मिळवून देणारा भारताचा प्रशिक्षक आता थेट पाकिस्तानला मदत करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानच्या संघाने आता भारताच्या एका प्रशिक्षकाला आपल्याकडे बोलावून घेतले आहे आणि त्याला संघाला विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.

भारतासाठी strength coach म्हणून एकेकाळी निक बेवरने काम पाहिले होते. खेळाडू मैदानात उतरून मेहनत घेत असतात. पण हे खेळाडू फिट राहावेत आणि त्यांची मैदानात खेळण्याची क्षमता वाढावी, यासाठी जे व्यायाम केले जातात ते निक भारतीय संघाकडून करून घेत होता. पण निकचे भारतीय संघाबरोबरचा करार संपला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानच्या संघाने निकला करारबद्ध केले आहे. येत्या काही दिववसांमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकात आपले खेळूड फिट राहावे आणि त्यांना मैदानात चांगली कामगिरी करता यावी, यासाठी पाकिस्तानच्या संघाने निकशी करार केला आहे. त्यामुुळए विश्वचषकात पाकिस्तानच्या खेळाडूंचा फिटनेस कसा वाढतो, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. त्यामुळे आता निक संघात दाखल झाल्यावर पाकिस्तानचे खेळाडू जिममध्ये किती वेळ व्यतित करतात, हा पाहावे लागेल.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषकाचा अंतिम सामना रविवारी रंगणार आहे. पाकिस्तानला हा सामना जिंकत जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी भारताला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. आता रविवारी हा सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो आणि जेतेपद पटकावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे आता रविवारी आशिया चषक स्पर्धेत महासंग्राम होणार आहे. भारत अंतिम फेरीत यावेळी नाही. त्यामुळे या अंतिम फेरीला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, हेदेखील पाहावे लागेल.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here