Mumbai Local Train : माटुंगा- मुलुंड आणि पनवेल- वाशी मार्गावर मध्य रेल्वेने आज, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही.

हायलाइट्स:
- मध्य, हार्बर मार्गांवर आज खोळंबा
- पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही
- सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या कालावधीत ब्लॉक
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या कालावधीत ब्लॉक असेल. यामुळे ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर ट्रेन थांबणार असून लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वेमार्गावर पनवेल आणि वाशीदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या कालावधीत मेगाब्लॉक आहे. परिणामी या काळात पनवेल/बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/ नेरुळ-खारकोपर मार्गावर लोकलसेवा सुरू राहणार आहे.
शिंदे गटातला एक आमदारच कमी होण्याची भीती, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने धाकधूक वाढवली
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.