Aurangabad News : वीज पडून औरंगाबाद जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू तर दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिशोर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, शनिवारी शहर परिसरातही पावसाने हजेरी लावली.

 

Aurangabad News
Aurangabad News : औरंगाबादेत तुफान पाऊस; दोघांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू

हायलाइट्स:

  • वीज पडून दोन जणांचा मृत्यू
  • औरंगाबादेतील घटना
  • जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
औरंगाबाद : वीज पडून औरंगाबाद जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू तर दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिशोर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, शनिवारी शहर परिसरातही पावसाने हजेरी लावली.

गेल्या काही दिवसापासून शहर व जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम असून कुठे दमदार तर कुठे हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. शनिवारीही अनेक भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, कन्नड तालुक्यात मौजे नादरपूर येथे सायंकाळी सहा वाजेच्या सूमारास शेता शेजारी डोंगर कडेला वीज पडून नामदेव शेनफडू निकम (३४) यांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राला तब्बल १२ हजार कोटींचा दंड; ‘हे’ आहे कारण
प्रकाश तेजराव निकम (३०), दिपक विष्णू निकम (२२) हे दोघे जखमी झाले असून जखमींना पिशोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तर औरंगाबाद तहसील कार्यालय हद्दीत असलेल्या मौजे एकोड तांडा क्रमांक तीन येथे दुपारी अडीच वाजता पाऊस सुरू असताना वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला. आनंद बद्रीनाथ चव्हाण (१६) असे त्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, वीज कोसळून वैजापूर तालुक्यातील दसकुली येथे एक गाय दगावली.

शिंदे गटातला एक आमदारच कमी होण्याची भीती, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने धाकधूक वाढवली

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here