वाचा:
महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या कथित नाराजीच्या मुद्द्यावरून अलीकडेच यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर काँग्रेस नाराज नसल्याचे आणि महाविकास आघाडी भक्कम असल्याचे थोरात यांनी जाहीर केले होते. त्यावरून विखेंनी थोरातांवर टीका केली होती. काँग्रेस इतकी लाचार कधी झाली नव्हती, असं ते म्हणाले. थोरातांनी त्यांना जशास तसं उत्तर दिलं. त्यावरून दोघांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. या वादात उडी घेत शिवसेनेनं आज ‘सामना’च्या अग्रलेखातून विखे-पाटील यांच्यावर टीका केली होती. सत्तेसाठी पक्ष सोडून जाणाऱ्यांवरही अग्रलेखातून निशाणा साधला होता. कोकण आणि तळकोकणचा उल्लेखही त्यात होता. त्यावरून नीतेश राणे संतापले आहेत.
आणखी वाचा:
नीतेश राणे यांनी ट्टिव करून शिवसेनेला इशारा दिला आहे. ‘सामना’चं आमच्यावर प्रेम आहे. असणारच. का नाही असणार? कारण शेवटी जुनं ते सोनं असतं. पण शिवसेनेला काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता का? ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारातही घेतलं जात नाही,’ असं राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘काही पत्रं माझ्याकडंही आहेत. तळकोकणच्या प्रहारमधून लवकरच छापतो. मग बघू कशी कुरकुर होते, असा इशाराच नीतेश यांनी दिला आहे.
आणखी वाचा:
राणे, विखेंबद्दल ‘सामना’त काय म्हटले आहे?
‘मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणार्यांना महाराष्ट्र माफ करीत नाही हे प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले आहे. भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्या बाटग्यांचे आम्हाला आश्चर्य वाटते. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. हे बाटगे विरोधी पक्षात घुसल्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे,’ असा हल्लाबोल शिवसेनेनं ‘सामना’तून केला आहे.
आणखी वाचा:
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines