अमरावती : महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून सुपरिचित असलेल्या श्री. शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आज नवीन कार्यकारणी मंडळाच्या नऊ संचालक पदासाठी निवडणूक घेण्यात आली. मात्र, यामध्ये आमदार देवेंद्र भुयार हे थेट मतदान कक्षामध्ये गेल्याने ठाकरे गटाकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. धक्काबुक्की झाल्याने आमदार देवेंद्र भुयार आणि दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

श्री. शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये कार्यकारी परिषदेत निवडणूक आज घेण्यात आली यामध्ये विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचे प्रगती पॅनल तर विद्यमान उपाध्यक्ष नरेश चंद्र ठाकरे यांचे विकास पॅनल मध्ये चुरशीची लढत निर्माण झाली होती. अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष आणि सदस्य पदाच्या नऊ जागांसाठी ही निवडणूक होती. २०१७ ते २०२२ दरम्यान खांद्याला खांदा लावून काम करणारे दोन मित्र म्हणजेच माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख व काँग्रेसचे नेते नरेश चंद्र ठाकरे हे या निवडणुकीत परस्परविरोधी उभे होते.

नाशिक हादरलं, प्रसिद्ध उद्योजकाचा मृतदेह कालव्यात आढळला
दरम्यान, आज श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरू होती. आज पावणे बारा वाजेच्या दरम्यान आमदार देवेंद्र भुयार यांनी परिसरात प्रवेश केला आणि ते थेट मतदान कक्षात गेले. यावेळी ठाकरे गटाकडून आरोप करण्यात आला की तुम्ही मतदारांना धमकी व प्रलोभन देण्यासाठी आले आहेत. यावरूनच काही काळातच ठाकरे आणि देशमुख गटातील कार्यकर्ते एकमेकांवर भिडले. या ठिकाणी राळा झाल्याने मतदान प्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली होती.

पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष नरेश चंद्र ठाकरे व हर्षवर्धन देशमुख हे समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेप आणि लाठीचार्ज नंतर सध्या तणावपूर्ण परिस्थिती ही शांत झाली असून परिसरात तणाव आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून वातावरण शांत आहे.

शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांची ही शिक्षण संस्था आहे. शिवाजी शिक्षण संस्थेची आज निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत नऊ पदांसाठी २१ उमेदवार रिंगणात उभे आहेत. सकाळी ८ वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली आहे. हे मतदान संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. या निवडणुकीत ७७४ सभासद मतदान करणार आहेत. विकास पॅनल आणि प्रगती पॅनलमध्ये काटे की टक्कर होणार असल्याचं बोलले जात आहे.

बानकुळेंच्या स्वागतासाठी नाशकात बाईक रॅलीचं आयोजन, कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here