भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिनं रिलेशनशिपबद्दल सांगितलं. हृतिक रोशनचा मेकअप आर्टिस्ट विजय पलांडे
विजय पलांडेसोबत ती रिलेशनशीपमध्ये आहे. तिच्या चाहत्यांसाठी हे मोठंच सरप्राइझ होतं. भाग्यश्रीनं रिलेशनशिपबद्दल चाहत्यांना सांगितलं. हृतिक रोशनचा मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेबरोबर ती रिलेशनशिपमध्ये आहे. तिच्या चाहत्यांसाठी हे मोठंच सरप्राइझ होतं.
आज विजयच्या बर्थडेनिमित्तानं भाग्यश्रीनं एक खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
काय आहे भाग्यश्रीची पोस्ट?
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव्ह! मी माझ्या आयुष्यात आला त्याबद्दल देवाचे मी आभार मानते. मला यापूर्वी कधीही इतकं सुरक्षित वाटलं नव्हतं. आपल्याबद्दल लिहिण्यासाठी खूप काही आहे. पण तेकधीही संपणार नाही, असं म्हणत भाग्यश्रीनं तिच्या बॉयफ्रेंडला शुभेच्छा दिल्यात.
भाग्यश्री देवश्री गणेश मालिकेत काम करत होती. त्यात तिनं देवी पार्वतीचा भूमिका साकारली होती. तिच्याबरोबर पंकज विष्णूही होता. तिनं मराठी सिनेमांतही काम केलंय. २०११ मध्ये शोधू कुठे या मराठी सिनेमातून तिनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं. भाग्यश्रीनं तेलगू सिनेमातही भूमिका केली आहे.