अकोला : राष्ट्रवादीचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी आणि अकोल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वादाने आता टोक गाठलं आहे. व्हायरल होत असलेल्या विविध व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी थेट सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिटकरींच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर आरोप करणारे शिवा मोहोड यांना सायबर सेलकडून हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अकोल्यात राष्ट्रवादी पक्षात पदाधिकारी आणि आमदारांकडून एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीचे शिवा मोहोड यांनी थेट मिटकरी हे कामासाठी कमिशन घेत असल्याचा आरोप केला होता. तसंच एका महिला पदाधिकाऱ्याचं काय प्रकरण आहे? असा सवाल अमोल मिटकरी यांना विचारण्यात आला होता. त्यानंतर मिटकरींनी आरोप फेटाळत शिवा मोहोडांना सूचक इशारा दिला होता. सध्या राज्यभरात हा विषय चांगलाच रंगला आहे.

Shivsena: सदा सरवणकरांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी पोलिसाला लागली असती, अखेर गुन्हा दाखल

दरम्यान, आता अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातील वादाला नवीन वळण आलं असून मिटकरींनी थेट अकोल्याच्या सायबर सेलला व्हिडिओ वायरल केल्याप्रकरणी आणि इतर व्हिडिओ वायरल होण्याची शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर सायबर सेलचे प्रमुख राहुल वाघ यांनी शिवा मोहोड यांना फोनवरुन सायबर सेल इथे हजर होण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, शिवा मोहोड हे आता मंगळवारी सायबर सेलसमोर हजर होतील, अशी माहिती आहे. याप्रकरणी आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here