पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारपासून मुक्त करण्यासाठी डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. नवी दिल्ली येथे आज यासंदर्भात कायदेतज्ज्ञांच्या झालेल्या बैठकीनंतर डॉ. स्वामी यांनी याचिका दाखल करण्याचं जाहीर केलं आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून ७ ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. विधिज्ञ सत्या सब्रवाल, विधिज्ञ विशेष कोनोडीया यांच्यामार्फत मुंबई न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात येत आहे. त्यानंतर ९ ऑक्टोबरला डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे पंढरपूर येथे भेट देणार आहेत. यावेळी ते वारकरी संप्रदाय व विठ्ठल भक्तांची बैठकही घेणार आहेत.

Shivsena: सदा सरवणकरांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी पोलिसाला लागली असती, अखेर गुन्हा दाखल

विठ्ठल मंदिर आणि सरकारचा हस्तक्षेप

विठ्ठल मंदिर समितीची वार्षिक उलाढाल ३५ कोटींच्या आसपास असून विठुरायाच्या दर्शनाला वर्षभरात दीड कोटी भाविक येत असल्याने हे देवस्थान ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागते. पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. वर्षभरातील प्रमुख वाऱ्या या ठिकाणी बहरतात. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला महत्त्व आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या ठिकाणच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राजकीय व्यक्तींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेही या अध्यक्षपदाकडे पाहिले जाते.

या पार्श्वभूमीवर डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात केलेल्या याचिकेला महत्व आलं असून याप्रकरणी आगामी काळात कोर्टाकडून काय निर्देश दिले जातात, हे पाहावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here