चंद्रपूर : जिल्ह्यात पाऊस आणि विजांचं तांडव सुरू असल्याचं चित्र आहे. वीज कोसळल्याने तीन जणांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये सावली तालुक्यातील शेतमजूर महिलेचा आणि एका शेतकऱ्याचा समावेश आहे. शरद पंढरी मुनघाटे आणि मंगला सुधाकर येलेट्टीवार अशी मृतांची नावे आहेत.
स्थानिकांकडून घटनेची माहिती पाथरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यानंतर ठाणेदार मोहोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
दुसरी घटना सावली तालुक्यातीलच आहे. चकपिरंजी येथील महिला मजूर मंगला सुधाकर येलेट्टीवार या शेतात निंदणाचे काम करीत असताना अंगावर वीज कोसळल्याने त्यांनी आपले प्राण गमावले. या दोन घटनांनी सावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे.