asia cup 2022 final : आजचा सामना श्रीलंका जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटत नव्हते. पण श्रीलंकेच्या संघाने यावेळी कमाल केली. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने अशी कामगिरी केली की, त्यांनी क्रिके विश्वातील भल्या भल्या पंडीतांना आज खोटे ठरवले. श्रीलंकेच्या संघाने आजच्या सामन्यात नेमकं केलं तरी काय, जाणून घ्या यावेळी काय घडलं…

सामन्याच्या १७ व्या षटकात श्रीलंकेच्या संघाने एक खेळी केली आणि त्याचाच फायदा त्यांना झाला. ही गोष्ट घडली ती १७व्या षटकात. त्यावेळी मोहम्मद हा चांगल्या फॉर्मात दिसत होता. त्यावेळी श्रीलंकेच्या कर्णधाराने चेंडू वानिंडू हसरंगाच्या हातामध्ये दिला. हसरंगाने यावेळी मोहम्मद रिझवानला पहिल्याच चेंडूवर बाद केले आणि त्यांनी पाकिस्तानला मोठा धक्का दिला. कारण रिझवान हा श्रीलंकेच्या विजयातील मोठा अडसर ठरत होता. हसरंगा फक्त एवढ्यावर थांबला नाही तर त्याने तिसऱ्या चेंडूवर आसिफ अलीला बाद केले आणि पाकिस्तानला अजून एक धक्का दिला. त्यानंतर या षटकाच्या पाचव्या चेंडूवर खुशदिल शाहला बाद केले आणि एकाच षटकात त्याने तीन विकेट्स घेतले आणि हे एकच षटक श्रीलंकेसाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले. या एकमेव गोष्टीच्या जोरावर सामना श्रीलंकेच्या बाजूमे फिरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हे एक षटक पाकिस्तानला सामना जिंकवण्यापासून दूर घेऊन गेल्याचे पाहायला मिळाले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.