CM Eknath Shinde at Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर असून, पैठण (Paithan) येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र ज्या कावसानकर मैदानावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जाहीर सभा घेत आहे, त्या मैदानाला एक मोठा राजकीय इतिहास आहे. कारण याच मैदानावर कधीकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची (Shiv Sena Supremo Balasaheb Thackeray) तोफ धडाडली होती. त्यामुळे ही सभा महत्त्वाची समजली जात असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मैदानावरून कुणावर निशाणा साधणार याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणच्या कावसानकर मैदानावर आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जाहीर सभा होणार आहे. मात्र याच मैदानावर 21 डिसेंबर 1947 ला बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर सभा घेतली होती. त्यांनी या आपल्या सभेतून विरोधकांवर बाण सोडला होता. जुन्या जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेबांच्या या सभेसाठी जिल्हाभरातून लोकं सकाळपासून मैदानावर येऊन बसले होते. विशेष म्हणजे या सभेत मुस्लिमांची संख्या मोठ्याप्रमाणात होती. बाळासाहेबांची हीच सभा प्रचंड गाजल्याचेही बोललं जातं. आज ही सोशल मीडियावर या सभेतील बाळासाहेबांचे भाषण व्हायरल होताना पाहायला मिळतं. आता त्याच मैदानावर शिवसेनेत बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांची सभा होतेय.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष…

एकनाथ शिंदे शिवसेनेतील महत्त्वाचे नेते समजले जात होते. मात्र त्याच शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट तयार केला आहे. आता बाळासाहेबांनी घेतलेल्या मैदानावर त्यांची सभाही होतेय. दरम्यान दसऱ्या मेळाव्यात शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची सभा होणार यावरून वाद सुरू आहे. पण त्याआधीच बाळासाहेबांनी गाजवलेल्या मैदानावर आता एकनाथ शिंदेंचं भाषण गाजणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलाय.

सभेला अर्ध्या डझनपेक्षा अधिक मंत्री…

पैठण येथे होत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सभेला शिंदे गट आणि भाजप मधले अनेक मंत्री हजेरी लावणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे,रोहयो मंत्री संदिपान भुमरे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यासह आणखी काही मंत्री या सभेला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here