मुंबई : मुंबईतील गोवंडी परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इथल्या शासकीय मुलींच्या वसतिगृहातून शौचालयाची खिडकी आणि ग्रील तोडून सहा अल्पवयीन मुली पळून गेल्या आहेत. ही घटना ११ सप्टेंबर २०२२ रोजी म्हणजे रविवारी पहाटे ५ च्या सुमारास घडली. पळून जाण्यापूर्वी, मुलींनी हवालदाराच्या खोलीचे गेट बाहेरून लॉक केले, जेणेकरून हवालदाराला सुगावा लागल्यावर त्यांचा पाठलाग होऊ नये. नंतर ही बाब कळताच एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पळून गेलेल्या सहाही मुली अल्पवयीन असून त्यांची ओळख पटली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी गोवंडी पोलीस अधिक तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मुली पळून गेल्याची बातमी समजताच खळबळ उडाली. घाईघाईत रजिस्टर बाहेर काढले आणि इथे कोण आहे आणि कोण फरार आहे याची तपासणी सुरू झाली. सर्व नोंदी घेतल्यावर ६ मुली बेपत्ता असल्याचे आढळून आले आणि त्यानंतर त्यांचीही ओळख पटली.

पुणेकरांवर चक्क रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ, कारण वाचून हादराल
बेपत्ता विद्यार्थिनींची माहिती मिळताच वसतिगृह व्यवस्थापनाने हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे सोपवले आहे. गोवंडी पोलीस आता बेपत्ता मुलींचा शोध घेत आहेत. मानवी तस्करी, भीक मागणे अशा बेकायदेशीर गोष्टी करणाऱ्यांवर वेगवेगळ्या तपास यंत्रणा कारवाई करतात आणि तिथे सापडलेल्या अल्पवयीन मुलींची सुटका केली जाते. तेथून सुटका करण्यात आलेल्या विद्यार्थिनींना गोवंडीच्या या वसतिगृहात ठेवण्यात आले होते.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय समोर येणार…

पोलीस सूत्रांनी सांगितले की, आम्ही त्या मुलींची ओळख पटवली असून आता त्यांची सुटका केल्याच्या ठिकाणाचा तपास करत आहोत. इतकंच नाहीतर त्याच्याशी संबंधित कोणी आढळून आल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल. सध्या पोलीस वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत जेणे करून संपूर्ण गोष्टींचा उलगडा होईल.

Weather Update: मुंबई-पुणे, रत्नागिरीला मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here