मुंबई : माझी तुझी रेशीमगाठ मालिका संपली, आता यश काही रोज भेटणार नाही. म्हणून चाहते निराश झाले. पण त्यांच्यासाठीच एक चांगली बातमी. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वेचा आपडी थापडी सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. नुकताच या सिनेमाची टीझर लाँच केला गेला.

घर, नियम, सलमानचा लूक; बिग बॉस १६ मध्ये बदललं सर्वकाही! दिसली सिद्धार्थची झलक

अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या सिनेमाच्या केंद्रस्थानी आहे. सखाराम पाटीलच्या कंजुषीची उदाहरणं सिनेमाच्या टीझरमध्ये आपल्याला पाहता येतात. श्रेयसनं हा टीझर पेस्ट करत म्हटलंय, सखाराम पाटलासाठी महत्त्वाचं काय आहे? परिवार की पैसा? पण याबरोबरच या कथेला एक भावनिक किनार असल्यांचही टीझरमधून दिसतं. ‘आपडी-थापडी’ ही एक मनोरंजक कौटुंबिक कथा आहे.

श्रेयस तळपदेनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतोय, फॅमिलीचा पिक्चर, बघू फॅमिलीबरोबर. ‘आपडी-थापडी’ दसऱ्याच्या मुहूर्तावर ५ ऑक्टोबरपासून सिनेमागृहांत! बऱ्याच दिवसांनी श्रेयसचा सिनेमा येतोय, ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. सिनेमा एका छोट्या मुलीभोवती फिरतो. आपडी थापडी हा एक छोट्यांचा खेळ आहे. आपडी थापडी गुळाची पापडी, असं बालगीतही आहे. पूर्वी गावात अंगणात हा खेळ खेळला जायचा. या सिनेमात बाप-लेकीची कथा आहे. तो बाबा आहे श्रेयस तळपदे आणि आई आहे मुक्ता बर्वे. कोकणच्या पार्श्वभूमीवर सिनेमा आकार घेतो.

श्रेयस आणि मुक्ता

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीता करीर आणि आनंद करीर यांनी सिनेमाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट यात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. ‘फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडली आहे.

आशुतोष आणि अरुंधतीला एकत्र आणण्याचे प्रयत्न यशस्वी होणार का? हा Video

सैफ आणि करीना त्यांच्या मुलांसह एयरपोर्टवर कॅमेऱ्यात कैद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here