नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बिलोलीकडून तेलंगणा राज्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. संततधार पावसाने मांजरा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे. कालपासून संततधार पाऊस बरसत असल्याने या परिसरात चोहीकडे पाणीच पाणी झालं आहे तर येजगी गावाजवळ मांजरा नदी सध्या धोक्याच्या पातळीजवळून प्रवाहित झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
दरम्यान, बिलोली शहरातील रस्ते जलमय झाले असून रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानूसार, पाऊस दाखल झाल्याने बळीराजा सुखावला आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे चिमुकल्यानेही पावसाचा आनंद लुटला.