Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 12, 2022, 1:26 PM

Parbhani news : परभणीच्या जिंतूर शहरामध्ये तहसील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचे मॉर्फ केलेले फोटो व्हॉट्सअपवर टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

Parbhani news
Parbhani news : मॉर्फ केलेले फोटो व्हॉट्सअपवर, सरकारी महिला कर्मचाऱ्याची बदनामी; परभणीतील धक्कादायक प्रकार

हायलाइट्स:

  • तहसील कार्यालयातील महिलेचे फोटो मॉर्फ करुन बदनामी
  • फोटो व्हॉट्सअपवर फोटो टाकून केली बदनामी
  • परभणीतील जिंतूर शहरातील धक्कादायक प्रकार
परभणी : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा महिलांची फसवणूक झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, परभणीच्या जिंतूर शहरामध्ये तहसील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचे मॉर्फ केलेले फोटो व्हॉट्सअपवर टाकून बदनामीकारक मजकूर लिहून महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिंतूर तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याची बदनामी करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर सदरील महिलेचे मॉर्फ केलेले फोटो जिंतूर शहरातील महिला आणि नागरिकांच्या व्हाट्सअपवर टाकून बदनामीकारक मजकूर व फोटो पाठवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ज्या नंबरवरून जिंतूर शहरातील नागरिकांच्या व्हॉट्सअपवर फोटो आणि मजकूर टाकण्यात आला आहे तो नंबर बाहेर देशातला असल्याचे दिसून येत आहे.

बहिणीशी भांडण, भाच्यावर काढला राग, मामाने जे केलं त्यानं अख्खं परळी हादरलं…
नागरिकांच्या व्हॉट्सअपवर पाठवण्यात आलेला मजकूर अत्यंत बदनामीकारक असल्याने महिलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठून अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून लवकरच आरोपीचा शोध लावला जाईल असे पोलिसांनी सांगितलं आहे. सध्या स्थितीला मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करत आहेत. मात्र, सोशल मीडियाचा वापर करताना त्यांनी जपून वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अबब! वरळीत १५१ कोटींना दोन फ्लॅट, मुंबईच्या रियल इस्टेटमधील सर्वात मोठा व्यवहार?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here