एम.एच २२. ५५११ क्रमांकाच्या स्कार्पिओमधून बीड येथील बचांगे कुटुंब नांदेडवरून बीडकडे परत जात होते. गाडी परभणीच्या ब्रह्मपुरी शिवारात आली असता गाडीचे चालक राहुल पंडीत पवार (रा. कुमरेवाडी तांडा ता. धारुर जि. बीड) यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी कालव्यामध्ये जाऊन पडली. या अपघातामध्ये जयश्री सचिन बचाटे, अशोक अर्जुन बचाटे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर भास्कर रामभाऊ बचाटे, सचिन भास्कर बचाटे, दादासाहेब सदाशिव बचाटे, दिनेश बालासाहेब बचाटे हे चौघे जखमी झाले.
यावेळी स्कार्पिओ गाडीचा चालक राहुल पंडित याने जखमींची मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, बीट जमादार बळीराम मुंढे, पडोळे, वीरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले. याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यामध्ये दिनेश बचाटे यांच्या फिर्यादीवरुन निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकणी चालक राहुल पंडीत पवार याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यवंशी करत आहेत.