एमिली जागोडा असे या तरुणीचं नाव आहे. ती अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सॅन डिएगो येथील रहिवासी आहे. तिने सांगितले की हिंज, टिंडर किंवा बंबल सारख्या डेटिंग अॅप्सवर तिला स्वतःसाठी योग्य जोडीदार शोधण्यात अडथळे येत होते. म्हणूनच तिने ठरवले की वाटेत जो तरुण तिला आकर्षक वाटेल त्याला ती तिचा डेटिंग बायोडेटा देईल.
हेही वाचा –बाळाने ‘त्याला’ पप्पा म्हणावं की दादा? पाहा ही महिला काय करुन बसलीये…
डेटिंग रेझ्युमवर तिने तिचे काही फोटो छापलेले आहेत. त्यावर नाव, वय, फोन नंबर याशिवाय तिने बायोडाटामध्ये स्वतःबद्दलच्या काही रंजक गोष्टीही लिहिल्या आहेत. ती स्थानिक फास्ट फूड जॉइंट्स, रेस्टॉरंट्स, सुपरमार्केट आणि स्टोअरमध्ये हा बायोडाटा घेऊन जाते आणि तिला आवडणाऱ्या तरुणांना हा बायोडाटा देते.
एमिलीने याबाबतचा एक व्हिडिओ देखील टिकटॉकवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पुरुषांना तिचा बायोडाटा देताना दिसत आहे. सध्या या तरुणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डेटिंग रेझ्युमेशी संबंधित हा व्हिडिओ १ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत.

बॉयफ्रेंड मिळत नाहीये, या तरुणीने सॉलिड उपाय शोधला
हेही वाचा –Ocean Fire: समुद्राच्या मधोमध उसळले आगीच्या ज्वाळांचे लोट, VIDEO पाहून जगभर खळबळ…
बझफीडला दिलेल्या मुलाखतीत एमिलीने सांगितले की, सध्याच्या पिढीसाठी नवीन लोकांना भेटणे खूप कठीण झाले आहे. ऑनलाइन डेटिंगच्या माध्यमातूनही ते बॉयफ्रेंडचा शोध घेत असतात. पण, एमिलीला आशा आहे की ती तिच्या बॉयफ्रेंडला या डेटिंग रेझ्युमेद्वारेच भेटेल. मला वाटते की ही एक चांगली रणनीती आहे, असंही तिने सांगितली.
एमिलीने सांगितले की, आतापर्यंत तिला डेटिंग रिझ्यूमेमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. साहजिकच मला फक्त संमिश्र प्रतिसाद मिळतात. पण मी ज्या लोकांना डेटिंग रिझ्यूमे देते त्यांना ही कल्पना खूप आवडते.
हेही वाचा –मी सुंदर असल्याने मला अटक करुन बलात्काराचा प्रयत्न, महिलेच्या अजब दाव्याने पोलीसही बुचकळ्यात
‘आय लव्ह यु’ म्हण नाहीतर बॅनर लावीन; विवाहितेला त्रास देणाऱ्या मजनू विरोधात गुन्हा दाखल