Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 12, 2022, 3:33 PM
Navi Mumbai : शाळकरी मुलांना घेऊन जात असताना एका स्कूल बसला आग लागल्याची बातमी समोर आली आहे. खारघरमध्ये ही घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना वेळीच बसमधून उतरवल्याने सुदैवाने ही दुर्घटना टळली आहे.

हायलाइट्स:
- शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला आग
- विद्यार्थ्यांना वेळीच उतरवल्याने सुदैवाने दुर्घटना टळली
- अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील खारघर येथील पीपल एज्युकेशन संस्थेच्या स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होती. खारघर सेक्टर १५ येथील घरकुल सोसायटीजवळ ही स्कूल बस आली असता अचानक या बसमधून धुराचे लोट येऊ लागले. बस चालकाने प्रसंगावधान साधत बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढलं.
त्यानंतर खारघर अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. मात्र, अचानक लागलेल्या या आगीत स्कूल बसचे मोठे नुकसान झाले असून बस चालकाच्या प्रसंगाधानाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.