अहमदनगर : मुस्लिम मुलीशी लग्न केले म्हणून अपहरण करण्यात आलेल्या दीपक बर्डे (Deepak Barde) या आदिवासी युवकाचा ३१ ऑगस्टलाच आरोपींनी खून केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला. अटकेत असलेल्या आरोपींकडून तपासात ही माहिती पुढे आल्याचे श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिस आता पुरावे संकलित करीत असल्याचे असल्याचे सांगण्यात आले. (it is revealed that the missing deepak barde was murdered)

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येतील आदिवासी समाजातील दीपक बर्डे याचे एका मुस्लिम युवतीसोबत प्रेम होते. मुलीच्या घरच्यांचा याला विरोध होता. तरीही त्या दोघांनी परस्पर लग्न केले. याची माहिती मुलीच्या घरच्यांना कळाल्यावर त्यांनी दीपकला मारहाण केली. त्याच्या ताब्यातून त्या मुलीला घेऊन गेले. नंतर त्यांनी तिला पुण्याला तिच्या मामाकडे ठेवले. याची माहिती मिळाल्यावर दीपक मित्रांसोबत पुण्याला गेला. तेथे गेल्यावर मुलीच्या मामाने दीपकला मारहाण केली. त्याचे अपहरण केले, असा आरोप त्याच्या मित्रांनी केला. त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

Ahmednagar news : मुस्लिम मुलीशी लग्न, हिंदू तरुणाचे अपहरण, कुटुंबीयांना घातपाताचा संशय
या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मजून शेख, इम्रान अब्बास शेख, समीर अहमद शेख, अजित शेख यांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती. यामध्ये पोलिसांना आज महत्वाची माहिती मिळाली आहे. आरोपींनी ३१ ऑगस्ट रोजीच आरोपीला बेदम मारहणा केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला, अशी माहिती आरोपींकडून पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे आता या माहितीच्या अनुषंगाने तपास करून पुराव्यांचे संकलन सुरू आहे. लवकरच नेमका घटनाक्रम समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

नितेश राणेंकडून देवेंद्र फडणवीसांचा हिंदुहृदयसम्राट उल्लेख, श्रीरामपूरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना उघड धमकी

morcha by nitesh rane

आमदार नितेश राणेंनी काढला होता मार्चा

दरम्यान, या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूरमध्ये येऊन मोर्चा काढला होता. बेपत्ता दीपक बर्डेचा तीन दिवसांत तपास लावा अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून या प्रकरणी आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक स्थापन केले जाईल. या प्रकरणात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा राणे यांनी दिला होता.

शिंदे विरुद्ध ठाकरे; गणेश विसर्जन मिरवणुकीतच शिवसेनेतील दोन गट आमने-सामने आल्याने तणाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here